समानार्थी शब्द मराठी - समानार्थीशब्द.कॉम

समानार्थी शब्द

मराठी

व्याख्या:

एखाद्या शब्दाचा आशय जवळपास तेवढ्याच प्रमाणात व्यक्त करणारा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय. कोणत्याही शब्दाला समानार्थी शब्द नसतो असा एक विचार आधुनिक भाषाभ्यासात सांगितलेला आहे. कारण प्रत्येक शब्दाचे विशिष्ट असे कार्य असते. ते कार्य त्या शब्दाधारेच यथायोग्यपणे होऊ शकते. एखाद्या शब्दाचा पर्यायी शब्द हा समानार्थी शब्द होत नाही. एखाद्या शब्दाच्या विविधांगी अर्थच्छटांसाठी समर्पक शब्द पर्यायी शब्दांमधून मिळवता येतो. व्यक्ती व्यवहारात शब्द वापरताना यथार्थ शब्दाची निवड करते. कवितांमधून येणाऱ्या समानार्थी शब्दांचा वापर अभ्यासनीय असतो. कवीला अपेक्षित असलेले सौंदर्य, नाद, गेयता साधण्यासाठी योग्य शब्दांचा तो वापर करतो. कोणत्याही भाषेत एका शब्दाचे असे एकापेक्षा अधिक पर्याय उपलब्ध असतात.

मराठी

समानार्थी शब्द:

शब्दसमानार्थी
अंकआकडा, मांडी.
अंकणधान्य.
अंकनमोजणे.
अंकालदुष्काळ.
अंकितदेश, स्वाधीन.
अक्राळविक्राळउग्र, भयंकर, भेसूर, राक्षसी.
अक्षरअविनाशी, शाश्वत.
अंगकाया, कुडी, तनू, देह, बाजू, वपु, शरीर.
अंगठीअंगुलियक, उर्मिका, जाहंगीर, पवित्र, फासा, भोरडी, मुद्रिका, वळे, वेडण, वेढे.
अंगणआवार.
अंगणास्त्री.
अगत्यआदर, आपुलकी, आस्था, कळकळ, कळवळा.
अगमझाड, वृक्ष.
अगम्यसमजू न शकणारे.
अगाधअगम्य, अमर्याद, गंभीर, गहन.
अंगारनिखारा.
अंगाराइंगळ, निखारा, भस्म, विस्तव.
अंगुलीबोट.
अग्नीअंगार, अनल, आग, आगीन, आग्न, कृशान, जाळ, ज्वाला, तपन, दहन, धनंजय, निखारा, पावक, वडवानल, वणवा, वन्ही, विस्तव, वैश्वानर, शिखी, हजल, हुताशन.
अग्रगण्यप्रमुख.
अग्रजवडील बंधू.
अग्रपूजापहिला मान.
अघटितअसंभाव्य, चमत्कारिक, विलक्षण.
अघोरभयंकर, भीतिदायक, वाईट.
अंघोळस्नान.
अचंबाआश्चर्य, नवल.
अचलगतीरहीत, गिरी, पर्वत, शांत, स्थिर.
अंचलपर्वत, शांत, स्थिर.
अचलापृथ्वी, हातरुमाल.
अचानकअकस्मात, अनपेक्षित, अवचित, एकाएकी.
अंजलीओंजळ.
अज्रलअग्नी.
अटशर्त.
अडचणसमस्या.
अंडजपक्षी.
अडथळाआडकाठी, मज्जाव, मनाई.
अडाणीअज्ञानी.
अंतअखेर, मरण, मृत्यू, शेवट.
अंतरिक्षअवकाश.
अतिथीपाहुणा.
अत्याचारअन्याय.
अंदाजअटकळ, अदमास, अनुमान, आकाटाका, आळाटोळा, आशंका, कयास, कल्पक, तर्क, ताडबाजी, तावतक, धुंदावा, पडताळा, संभव, होरा.
अद्भुतकरामत.
अद्यपाप.
अंधारअंधकार, अंधाई, अंधारी, अंधैर, काळोख, काळोसा, तम, तिमिर, धुरटा, ध्वांत, मसरै.
अंधुकअस्पष्ट, पुसट, मंद.
अध्वर्युपुढारी.
अनमान१. हयगय, अनादर. २. संकोच, उपेक्षा, दुलर्क्ष.
अनर्थअरिष्ट, संकट.
अनलअंगार, अग्नी, आगीन, आग्न, कृशान, जातवेद, निखारा, पावक, वन्ही, विस्तव, वैश्वानर, शिखी, हुताशन.
अनाथपोरका.
अनिलवारा.
अनुकरणनक्कल, माकडचेष्टा.
अनुक्रमणिकायादी, सूची.
अनुग्रहकृपा.
अनुचितअयोग्य.
अनुजधाकटा भाऊ, लहान बंधू.
अनुरक्तीप्रेम, माया.
अनृतखोटे.
अपंगपांगळा, लुळा, विकलांग, व्यंग.
अपघातदुर्घटना.
अपत्यमूल.
अपमानदुर्लौकिक, पराभव, मानभंग.
अपराधगुन्हा, दोष.
अपरुपअप्रप.
अपायइजा.
अपेक्षाभंगहिरमोड.
अंबकचक्षू, डोळा.
अंबर१. आकाश. २. वस्त्र.
अंबारधान्याचे कोठार.
अंबुदढग, मेघ.
अंबूजकमळ.
अभिजातउच्च दर्जाचा.
अभिनंदनगौरव.
अभिनयअंगविक्षेप, हावभाव.
अभिनवअपूर्व, नवीन, नूतन.
अभिनेतानट.
अभिप्रायअर्थ, आशय, उद्देश, तात्पर्य, भाव, भावार्थ, मतलब, हेतू.
अभिप्रेतअर्थ, उद्देश, हेतू.
अभिमानगर्व.
अभियानमोहीम.
अभिवादननमस्कार, प्रणाम, वंदन.
अभिवृद्धीउत्कर्ष.
अभिषेकअभिशेष, अभिषव.
अभिसरणप्रसरण, बदल.
अभ्यासपरिपाठ, व्यासंग, सराव, सवय.
अभ्युदयभरभराट.
अमर्यादअगणित, अमित, असंख्य.
अमापपुष्कळ, भरपूर, विपुल.
अमितअगणित, अतिशय, अपार, अमर्याद, असंख्य, असीम, बहुत.
अमृतपीयुष, पीयूष, संजीवनी, सुधा.
अमेदमिश्रण.
अरकाटधूर्त.
अरण्यअचराण, अटवी, आडरान, कांतार, कानन, कान्तार, जंगल, झरकुंड, डांग, तबक, दाव, बन, राजी, रान, राहट, वन, विपिन, विपीन, व्यवहाळ, व्याहाळ, हजल, हुताशन.
अरिशत्रू.
अरीशत्रू.
अर्चनपूजा.
अर्जप्रार्थना, विनंती.
अर्जुनकिरिटी, किरीट, कौंतेय, धनंजय, पांडव, पार्थ, पृथानंदन, फाल्गुन, भरतर्षभ, भारत, सव्यसाची.
अर्णवसमुद्र.
अर्थअभिप्राय, उद्देश, तात्पर्य, भाव, भावार्थ, मत, मतलब, सार, हेतू.
अर्वदशकोटी.
अलीभुंगा.
अवकाळीअवेळी.
अवकाशअवधी, काल, वेळ, समय.
अवघडकठीण, दुर्घट, विकट.
अवचितएकदम.
अवधीकाळ, वेळ, समय.
अवनीपृथ्वी.
अवर्षणदुष्काळ.
अविरतअखंड, सतत.
अव्याहतसतत.
अशक्तक्षीण, दुर्बल, रोडका.
अशुभअमंगल, वाईट.
अश्रूआसू.
अश्वघोड, घोडा, तुरग, तुरंग, तुरंगम, तुरुंग, वाजी, वारु, वारू, हय.
अष्टौप्रहररात्रंदिवस.
असंख्यअगणित, अपार, अमित, पुष्कळ, बहुत, बहू.
असामीइसम, माणूस, व्यक्ती.
असुरराक्षस.
असूदरक्त.
अस्कराप्रसिद्धी.
अस्काराप्रसिद्धी.
अस्तअंतर्धान, मावळणे, लोप, शेवट, शेवट होणे.
अस्तुरीपत्नी.
अस्थिपंजरहाडांचा सापळा.
अस्थिरक्षणिक, चंचल.
अस्सलखरा.
अहंकारअमर्ष, अमर्ष, गर्व, घमेंड, टेंभा, ताठा, दर्प, दुरभिमान, पोत, मद.
अहर्निशरात्रदिवस, रात्रंदिवस, सतत.
अहारओठ, ओष्ट.
अहिवासौभाग्यवती.
अहीतक्षक, भुजंग, व्याल, सर्प, साप.
आईअंबा, आईस, आउस, आऊस, आय, आवय, जननी, जन्मदा, जन्मदाती, जन्मदात्री, माउली, माऊली, माऊली, माता, मातोश्री, माय, मायमाउली, मासाहेब.
आकर्षणओढ, पाश, मोह.
आकसद्वेष.
आकांतआक्रंद, आक्रोश.
आकाररहितविद्रुप.
आकाशअंतराळ, अंतराळ, अंतरिक्ष, अंतरिक्ष, अंबर, अंबर, अंबुट, अंबुट, अवकाश, अवकाश, आधार, आभाळ, आभाळ, आसमान, आसमान, ख, गगन, गगन, तारांगण, तारांगण, नभ, नभ, नभांगण, रव, वितान, वितान, वियत, वियत, व्योम, व्योम.
आकाशगंगाक्षीरपथ, गंधर्वपथ, नियतगंगा, पांदी, मंदाकिनी, सुरसरिता, सुरसिंधू, स्वर्गंगा, स्वर्णदी.
आक्रमणचढाई, मोहीम, स्वारी, हल्ला.
आक्षेपशंका.
आगरनिवास.
आगीनविस्तव.
आग्रहअट्टहास, हट्ट, हेका.
आघातधक्का.
आजारपीडा, रोग, व्याधी.
आजारीपीडित, रोगी.
आजीवजन्मभर.
आजीवकभिक्षुक.
आज्ञाआदेश, हुकूम.
आठवडासप्ताह.
आठवणआठव, याद, सय, स्मरण, स्मृती, स्मृती.
आढ्यताकीर्ती.
आणशपथ.
आत्मजमुलगा.
आत्मजामुलगी.
आदित्यसूर्य.
आधिव्याधीदोष.
आधीअगोदर, प्रथम.
आनंदआनंदन, उद्धव, उद्धव, उल्लास, उल्हास, उल्हास, खुशी, तोष, तोष, प्रमोद, प्रमोद, मोद, मोद, संतोष, संतोष, हर्ष, हर्ष.
आननतोंड.
आयसलोखंड.
आयुधत्तस्त्र.
आयुष्यजीवन, हयात.
आरंभआदि, आदी, प्रारंभ, सुरूवात.
आरसाआदर्श, आयना, ईशणयंत्र, ऐना, दर्पण, भिंग, भिंगुले, मिरात, मुकुर.
आरासरोषणाई, सजावट.
आर्यहट्टी.
आलयघर.
आलापसूर.
आळशीआळसट, उंडगळ, ऐदी, कामचुकार, कुचर, मंद, सुस्त.
आळसमेद, सुस्ती.
आवडहौस.
आवश्यकतागरज, जरूरी.
आवाजअरवळ, आगाज, आरव, आहट, कंड, घोष, चाचल, चाहूल, डिंव, ध्वनी, ध्वान, नाद, निनाद, रव, सपळ, सर, साद.
आवाहनआमंत्रण, बोलवणे, विनंती.
आशयभाव.
आशिकप्रणयीलुब्ध.
आश्चर्यअचंबा, अचंबा, आचरय, आचरिय, आचीर, आच्छरिय, नवल, नवलपरी, विस्मय.
आश्वासकउत्साहवर्धक, प्रोत्साहक.
आसक्तीलाभ, हव्यास.
आसनबैठक.
आस्थाअगत्य, आदर, आपुलकी, काळजी, चिंता, जिव्हाळा, तळमळ.
आहारअन्न, खाणे, खाद्य, खाद्य, जेवण, भोजन.
इंगळीविंचू.
इच्छाअपेक्षा, अभिलाषा, आकांक्षा, आर्जू, आशा, आस, कामना, मनीषा, लालसा, वासना, स्पृहा.
इज्जतअब्रू.
इतमामथाट, लवाजमा, व्यवस्था, सरंजाम.
इतराजअप्रसन्न, नाखूष, नाराज, रुष्ट.
इंदिरालक्ष्मी.
इंद्रतासव, देवेंद्र, देवेंद्र, देवेन्द्र, नाकेश, नाकेश, पुरंदर, पुरंदर, वज्रपाणि, वज्रपाणि, वज्रपाणी, वज्रपाणी, वासव, वासव, शक्र, शक्र, शुक्र, शुक्र, सहस्त्राक्ष, सहस्राक्ष, सहस्राक्ष, सुरेंद्र, सुरेंद्र.
इंद्रजालमायामोह.
इन्कारनाकबूली, नापसंती, निषेध.
इन्साफनिर्णय, न्याय.
इमानीएकनिष्ठ, नेक, प्रामाणिक.
इशाराखूण, सूचना.
इहलोकमृत्यूलोक.
ईर्षाचुरस.
ईश्वरअनंत, अमर, अलक्ष, अलख, आनंदघन, ईश, जगन्नाथ, त्रिदश, देव, निर्गुण, निर्जर, परमात्मा, परमेश, परमेश्वर, परमेश्वर, प्रभू, महाप्रभू, विबुध, सुर.
उक्तीवचन.
उखाणाकूटप्रश्न.
उचल्याभामटा.
उजळचकचकीत.
उजेडतेज, प्रकाश.
उंटउष्टर, उष्ट्र.
उठाळसुस्त.
उणीवकमतरता, दोष, न्यूनता.
उतारूप्रवासी, यात्रिक, यात्रेकरू.
उत्कर्षचलती, भरभराट, वाढ, वाढ, संपन्नता, समृद्धी.
उत्पन्नप्राप्ती, मिळकत.
उत्साहआवेश.
उत्सुकअधीर, आतुर, आसक्ती, उत्कांठित.
उदकजल.
उदरपोट.
उदरनिर्वाहउदरभरण, उपजीविका, चरितार्थ, जीविकोपार्जन, योगक्षेम.
उदासखिन्न, निराश, निरुत्साह.
उद्दामअसभ्य, उद्धट, उर्मट.
उद्दिष्टलक्ष्य.
उद्देशहेतू.
उद्यानबगीचा.
उद्युक्तप्रेरित.
उन्मादआवेश.
उपद्रवत्रास.
उपद्व्यापखटाटोप.
उपनयनमुंज.
उपवनउद्यान.
उपहासचेष्टा, थट्टा, मस्करी.
उपानहजोडे.
उपासनाआराधना, पूजा, भक्ती, सेवा.
उपेक्षादुर्लक्ष.
उबगविट.
उभाखडा, सरळ.
उमदातरुण.
उमेदउत्साह, धैर्य, हिंमत.
उरगभुजंग.
उरोधीतिएकमेकांशी वाद घालतात.
उल्हासउत्साह.
उषाअरुणोदय, उषःकाल, पहाट, प्रभात, प्रातःकाल, सकाळ.
उसंतआराम, फुरसत, विश्रांती, विसावा.
ऋणउपकार, कर्ज, रीण.
ऋतूमोसम.
ऋषीतपस्वी, तापस, तापसी, बैरागी, मुनी, योगी, वली, संत, संन्यासी, साधक, साधू.
एकटाएकला, एकाकी.
एकभावएकचित्त.
एकमेवफक्त एकच.
एकमोडीएककल्ली, एकमार्गी.
एकलकोंडाएकटाच राहणारा.
एकलाधीएकी.
एकवारएकडा, एकवेळ.
एकाएकीअपचित, एकदम.
एकाग्रएकचित्त, एकतान, एकतानता, एकभाव, स्थिर.
एहसानउपकार, कृपा, दया.
ऐक्यएकत्व, एकी, एकोपा, मिलाफ, सूट.
ऐच्छिकइच्छिलेले, इष्ट.
ऐटडौल, ताठा, दिमाख, नखरा, मिजास, रुबाब.
ऐदीआळशी, जड, मंद, सुस्त.
ऐपतकुवत.
ऐरावतइंद्राचे वाहन (हत्ती).
ऐवजमालमत्ता.
ऐश्वर्यवैभव.
ऐषआरामचैन, सुख, सुखोपभोग, स्वस्थता.
ऐसपैसअमर्याद, प्रशस्त, विस्तीर्ण.
ओघकानन, प्रवाह.
ओजतेज.
ओंजळपसा.
ओझेकाळजी, जबाबदारी, बोजा, भार, वजन.
ओटानाला, प्रवाह.
ओंडखोल, टरफल, लोंगर.
ओढाझरा, नाला.
ओढाळअनिर्बंध, उनाड, खट्याळ, भटक्या.
ओढीकल, माया, लळा, सवय.
ओनामाप्रारंभ.
ओबडधोबडखरबरीत, बेडौल, बेढव, रांगडे.
ओळखपरिचय.
ओहळओढा.
ओहोळओढा, नाला.
औक्षआयुष्य, जीवित.
औक्षणओवाळणे.
औखळअवखळ, खोडकर.
औदार्यउदारता.
औसअमावस्या, अमावास्या, अवस.
औसापुजारी.
कचअडचण, अरिष्ट, माघार, संकट.
कच्चलहान खळगा.
कंजूषकृपण, कोमटा, खंक, खंख, चिक्कू, हिमटा.
कज्जाखटला, तंटा, भांडण, लढाई, वैर.
कटाक्षकल, शेख.
कटीकंबर, कमर.
कठीणअवघड, बिकट.
कठोरनिर्दयी, निष्ठूर.
कणकसोने.
कणवकरुणा, करूणा, कीव, कृपा, दया, माया.
कथाकहाणी, गोष्ट, हकिकत, हकीकत, हकीगत.
कंदुकचेंडू.
कंदूकचेंडू.
कनकसोने.
कन्याआत्मजा, कन्यका, चिरंजीवीनी, तनया, तनुजा, दुहिता, नंदिनी, पुत्री, पोर, पोरगी, बाला, बालिका, मुलगी, लेक, सुता.
कपटकावा, खोटेपणा, डाव, डावपेच, लबाडी.
कपडाअंबर, पट, वसन, वस्त्र.
कपाळअलिक, कपोल, निटिल., निढळ, निदळ, भाल, भाळ, मस्तक, ललाट.
कपुत्रकबुतर.
कबूलअनुकूल, अभिमत, पसंत, मंजूर, मान्य, संमत.
कभिन्नअतिशय.
कमलअनुच्छेद, मुद्दा.
कमळअंबुज, अब्ज, अंभोज, अंभोरुह, अरविंद, उत्पल, कंज, कमल, कमलिनी, कुमुद, जलज, जलद, नलिनी, नीरज, पंकज, पदम, पद्म, राजीव, सरोज.
कमेठदानातणी.
कमेयानोकर.
करहात.
करडाकठोर, कडक, निर्दय, निष्ठूर.
करणीकृती, कृत्य, क्रिया.
करमणूकमनोरंजन.
करारकबुली, ठराव, वचन.
करीहत्ती.
करुणादया.
कर्कशकठोर, कर्णकठोर, किर्र, बोचणारे, बोचरे, भांडण.
कर्जदारऋणको, ऋणदार, ऋणाईत, ऋणिया, देणेकरी.
कर्णधारकप्तान.
कर्तृत्वकर्तुक, कर्तुकी, कर्तुप, पराक्रम.
कर्मयोगदैव, प्रारब्ध, योगायोग.
कलंककाळीमा, डाग, दोष.
कलहभांडण.
कलागतकळ, भांडण, लावालावी, वैर.
कलावंतकलाकार.
कल्पनाउपाय, तोड, पेच, युक्ती, शक्कल.
कल्याणकुशल, क्षेम, भले, हित.
कळकळआस्था, काळजी, चिंता, फिकीर.
कळसकलश, घुमट, टोक, शिखर.
कवचआच्छादन, आवरण, टरफल.
कविताकाव्य, पद्य.
कशिदाभरतकाम.
कष्टमेहनत, श्रम.
कसजोर, दम, सामर्थ्य, सामार्थ्य.
कसबकौशल्य.
कसरतमेहनत, व्यायाम, सराव, सवय.
कसारतलाव.
कसूरकुचराई, चूक, दोष, न्यूनता.
काककावळा.
कांचनसोने.
काठकिनारा, तट, तीर.
कांतातली.
कांतारतलाव.
कानकर्ण, श्रवण, श्रोत, श्रोत्र.
काननवन.
कानेरआवाज.
कापडअंबर, चीर, पट, वसन, वस्त्र.
कामकर्तव्य, कार्य, कृत्य.
कामचुकारआळशी, आळसट, उठवळ, उठाळ, उंठोळ, उंडगळ, ऐदी, कुचर, निरुद्योगी, सुस्त.
कामनाइच्छा.
कामिनीस्त्री.
कायाशरीर.
कारस्थानकट, गुप्त, मसलत, स्वल.
कारागृहकैदखाना, तुरुंग.
कार्यकाज, काम.
कार्यक्षमकर्तुमकर्ता, कुशल, दक्ष, निपुण, हुशार.
कालअवधी, अवसर, घडी, वेळ, समय.
कालवडगाईचे वासरु.
कालवाकावला, खंदक, खाल, खुडा, खोंगळा, चर, जुत्री, थुडके, नहर, पन्हळ, परवा, पाट, वरंभा, वोघ, संगर, सारण, हरळ, हरळी, हाडी.
काळअवधी, अवसर, घडी, वेळ, समय.
काळजीआस्था, कळकळ, कळवळा, चिंता, तमा, पर्वा, फिकीर, विवंचना.
काळोखअंधकार, अंधार, तम, तम, तिमिर.
कावळाएकाक्ष, एकास, काउळा, काऊ, काक, टाकाकक्ष, वायस.
काष्ठलाकूड, सरपण.
कासवकच्छ, कच्छप, कमट, कमठ, कूर्म.
किंकरदास, सेवक.
कित्तानमुना.
किनाराकाठ, तीर.
किंमतदर, भाव, मुल्य, मोल.
किमयाचमत्कार, जादू.
किरकोळअशला, बारीक, रोडका, हडकुळा.
किरणअंशु, अंशू, कर, मयुख, मयूख, रश्मी.
किरमंसर्दी.
किल्लाकोट, गड, तट, दुर्ग.
कीडकीटक, खोटे, गंज, वाईट.
कीर्तीख्याती, नावलौकिक, प्रसिद्धी, लौकिक.
कीलअडसर, खिळा, पाचर, मेख.
कीवकरूणा, कृपा, दया.
कुंजबगीचा.
कुंजर१. हत्ती. २. हरिण.
कुटाळउपहास, कुचेष्टा, टवाळी, निंदा.
कुटुंबपरिवार.
कुठारकुर्‍हाड.
कुठारीकुर्‍हाड.
कुतूहलआश्चर्य, उत्सुकता, नवल.
कुत्राश्वान, सारमेय.
कुभांडआळ, कट, कारस्थान, भांडण, लबाडी.
कुमकमदत.
कुरंगकाळवीट, हरीण.
कुरापतकुचाळी, खोडी, टवाळकी, थट्टा.
कुरूपबेढब, विद्रूप, विरूप.
कुर्‍हाडकुठार.
कुशलखुशाल, चतुर, प्रवीण, बुद्धिमान, सुखरूप, हुशार.
कुष्ठरोगीमहारोगी.
कूजनपक्ष्यांचे गाणे.
कूर्मकासव.
कृपणकंजुष, कंजूष, कद्रू, कोमटा, खंक, चिकट, चिकू, चिक्कू, हिमटा.
कृपादया.
कृमीकीटक.
कृशबारीक, हडकुळा.
कृष्णकन्हैया, कान्हा, किशा, किसन, किस्ना, कृष्णसखा, गिरिधर, गोपाळ, गोपीवल्लभ, गोविंद, चक्रधर, देवकीनंदन, देवकीपुत्र, प्रभू, मधुसूदन, माधव, मीरा रुक्मिणीवर, मुकुंद, मुरलीधर, मुरारी, यदुनाथ, यादव, यादवेश्वर, राधाधर, राधारमण, वसुदेवसुत, वासुदेव, हरी, हृषिकेश.
केशकेस, बाल, रोम, लव.
कोकिळकोइल, कोकिल, कोगूळ, कोयल, पिक.
कोकीळकोइल, कोकील, कोगूळ, कोयल, पिक.
कोठारभांडार, साठा.
कोंडाचुरा, तूस, भुगा, भूय.
कोताअपुरा, आखूड, कमी, क्षुद्र, लहान.
कोंबअंकुर.
कोंभअंकुर, कोंब, खांब, मोड.
कोमलनाजूक, मऊ, मृदू, सुंदर.
कोवळीककोमलता.
कौमुदीचांदणे.
कौशल्यकरामत, कसब, खुबी, चातुर्य, नैपुण्य, प्रावीण्य, हातोटी.
क्रमअनुक्रम, ओळ, पद्धती, रांग.
क्रीडाक्रीडन, खेळ, मनोरंजन, मौज, लीला, विलास, विहार.
क्रूरनिर्घृण, निर्दय, निष्ठुर, नृशंस, पाषाणहृदयी.
क्रोधसंताप.
क्षणायूअल्पकाळ टिकणे.
क्षतीहानी.
क्षनइजा, जखम, व्रण.
क्षमामाफी.
क्षयक्षीणपणा, झीज, नाश, र्‍हास.
क्षीणअशक्त.
क्षीरदूध.
क्षुद्रउणेपणा, क्षुल्लक, हलके.
क्षुधाभुक, भूक.
क्षुरंग (तुरग)घोडा.
क्षेमकल्याण, कल्याण, कुशल, भलाई, भले, हित.
क्षोदचूर्ण, पूड, भुकटी.
क्षोभक्रोध.
खंक१. दीन, दरिद्री, द्रव्यहीन, निर्धन. २. कंजूष.
खगअंडज, द्विज, पक्षी, पाखरु, पाखरू, विहंग, विहंगम, शकुन्त.
खगेंद्रगरुड.
खचगंज, ढीग, थर, दाटी, रास.
खचितखरोखर, खात्री, निश्चित.
खजिनाकोश, कोष, कोषागार, तिजोरी, द्रव्यनिधी, द्रव्यभांडार, भांडागार, भांडार.
खजीटरओशाळा, लज्जित, शरमलेला, शरमिंदा.
खटकाकलह, झगडा, तंटा, भांडण, वाद.
खटाटोपधडपड, प्रयत्न, मेहनत.
खटाराछकडा, धूड, बैलगाडी.
खट्याळउनाड, उपद्व्यापी, खोडकर, द्वाड, हूड.
खडगवत.
खडकदगड, पाषाण, प्रस्तर, शिळा.
खड्गतलवार.
खणकप्पा.
खंदाधाडसी, सामर्थ्यवान, साहसी.
खबरबातमी, माहिती, वार्ता, संदेश.
खरमरीतखणखणी, तीक्षण, प्रखर, सडेतोड.
खराप्रामाणिक, विश्वास, सच्चा, सरळ.
खलअधम, दुर्जन, दुष्ट, नीच, पापी.
खलाशीकोळी, खारवा, नाखवा, नावाडी.
खहरसुंगी, हंगाम.
खात्रीविश्वास.
खिनक्षण.
खिन्नउदास, त्रास, दुःख.
खीरलापशी.
खुमारीगोडी, लज्जत.
खुळचटनेभळा, पुळचट, भित्रा.
खुळाअक्कलशून्य, बावळा, मूर्ख, वेडा.
खुशप्रसन्न.
खुषीआनंद, तोष, प्रसन्नता, संतोष, समाधान.
खूणचिन्ह, ठसा, निशाणी, प्रतीक, संकेत.
खूपपुष्कळ, भरपूर, विपुल.
खेडअडथळा, अध्याय, ग्रंथ, व्यत्यय.
खेडूतगावकरी, ग्रामस्थ.
खेडेगाव, ग्राम.
खेडेगावऊट, खेट, गाऊ, गाव, ग्राम, घोष, जवार, दिह, देहात, मजरे, मौजा, मौजे.
खेतखिन्नता, खेद, हुरहुर.
खेददुःख, विषाद, वैषम्य.
खोपापक्ष्यांचे घरटे.
गंगाअलकनंदा, देवनदी, भागीरथी, मंदाकिनी, सुरसरी, सुरसुरी.
गडकिल्ला.
गडपअदृश्य, नष्ट, बेपत्ता.
गणतीमोजणी.
गणपतीएकदंत, ओरड, कृष्णपिंगाक्ष, खटाटोप, गजमुख, गजवक्र, गजवदन, गजानन, गणनायक, गणपती, गणपतीबाप्पा, गणराय, गणाधिपती, गणाधीश, गणेश, गदारोळ, गिरिजात्मज, गोंधळ, गौरीनंदन, गौरीपुत्र, गौरीसुत, चिंतामणी, दंगा, धरणीधर, निधी, बल्लाळेश्वर, बुद्धीमत्ता, भालचंद्र, मयूरेश्वर, महागणपती, मोरया, मोरेश्वर, लक्षप्रद, लंबोदर, वक्रतुंड, विकट, विघ्नराजेंद्र, विघ्नहर, विघ्नहर्ता, विघ्नेश, विघ्नेश्वर, विनायक, व्यंकटेश, शिवसुत, सिद्धिविनायक, हुल्लड, हेरंब.
गणेशएकदंत, ओरड, कृष्णपिंगाक्ष, खटाटोप, गजमुख, गजवक्र, गजवदन, गजानन, गणनायक, गणपती, गणपतीबाप्पा, गणराय, गणाधिपती, गणाधीश, गणेश, गदारोळ, गिरिजात्मज, गोंधळ, गौरीनंदन, गौरीपुत्र, गौरीसुत, चिंतामणी, दंगा, धरणीधर, निधी, बल्लाळेश्वर, बुद्धीमत्ता, भालचंद्र, मयूरेश्वर, महागणपती, मोरया, मोरेश्वर, लक्षप्रद, लंबोदर, वक्रतुंड, विकट, विघ्नराजेंद्र, विघ्नहर, विघ्नहर्ता, विघ्नेश, विघ्नेश्वर, विनायक, व्यंकटेश, शिवसुत, सिद्धिविनायक, हुल्लड, हेरंब.
गंधदरवळ, परिमळ, वास.
गनीमअरी, चोर, शत्रु, शत्रू.
गनीमतलुट.
गबरश्रीमंत.
गबाळाअजागळ, बावळट, बावळा, मूर्ख.
गयावयाकरूणा, काकुळती, याचना, विनवणी.
गरकावाटोळा.
गरजअडचण, आवश्यकता, जरुरी, जरूरी, नड, निकड.
गरमउबदार, उष्ण, तप्त.
गरीबदीन, दुबळा, पामर, लाचार.
गरुडखगेंद्र, खगेन्द्र, खगेश्वर, तार्क्ष्य, द्विजराज, द्विराज, पक्षिराज, वैनतेय.
गरूडखगेंद्र, खगेन्द्र, खगेश्वर, तार्क्ष्य, द्विजराज, द्विराज, पक्षिराज, वैनतेय.
गर्वअहंकार, घमेंड, ताठा, दर्प, मद.
गवईगायक.
गवततृण.
गवाक्षखिडकी.
गस्तपहारा, रखवाली, राखण.
गाढासखोल.
गाणेकवन, गान, गीत.
गाथाआर्या, कविता, काव्य.
गायगो, गोमाता, धेनू.
गारथंड, शीत, शीतल.
गिरीअचल, डोंगर, पर्वत.
गुच्छघोस, झुबका, तुरा.
गुद्दाठोसा, बुक्का, रट्टा.
गुन्हाअपराध.
गुलामीदास्य.
गुळमुळीतअस्पष्ट.
गैरअयोग्य.
गोगाय.
गोंगाटगलका, गलबला, गोंधळ.
गोडमधुर.
गोणीपोते.
गोतकूळ, गोत्र, पिढी, वंश.
गोपाळकन्हैया, कृष्ण, गिरीधर, गोविंद, मुरलीधर, मोहन.
गोळमधुर.
गोषवारातात्पर्य, संक्षेप, सारांश.
गोष्टकथा, कहानी.
गोसावीबैरागी.
गौरवसन्मान.
ग्रंथपुस्तक.
ग्रहकल्पना, भावना, समजूत.
ग्रामगाव.
ग्राहकगिर्‍हाईक.
ग्रीष्मउन्हाळा.
घडाघागर.
घडामोडउलथापालथ, खटाटोप, फेरफार, व्यवहार.
घडीदुमड, बस्तान, रचना, संच.
घणहातोडा.
घतजलह, ढग, पयोधर, मेघ.
घनढग.
घनदाटकाळोख, गडद, गर्द, गर्द, गाढ, घडधूप, घन, घनघोर, घोर, दाट, निबिड, बिकट.
घरआगर, आलय, गृह, गेह, ग्रह, धाम, निकेतन, निवास, भवन, भुक्त, भुवन, सदन.
घरटेखोपा.
घरोटाजाते.
घर्मघाम.
घाईगडबड, जलदी, तातडी, त्वरा.
घागरघडा, मडके.
घाटआकार, घडण, ठेवण, रचना.
घाननाश, वध, विध्वंस, संहार.
घावआघात, तडाखा, प्रहार, वार.
घासकवळ, गवत, ग्रास, चारा, तृण, शब्प.
घुसराडुक्कर.
घेरपरिसर, परीध, लेढा, वर्तुळ.
घोडाअबलख, अश्व, अस्प, तुरग, तुरंग, तुरंगम, वाजी, वारु, वारू, हय.
चकणाकाणा, तिरपा, तिरळा, तिरवा.
चक्रचाक.
चक्रपाणीगोपाळ, घनश्याम, मुरलीधर, श्रीकृष्ण.
चक्षूडोळा, नेत्र.
चंगळ१. मुबलक, पुष्कळ. २. चैन, विपुल, विपुलता.
चंचलअधीर, उच्छृंखल, उतावळा, स्वैर.
चंचुप्रवेशअल्पप्रवेश.
चटकनचटदिशी, झटपट, झपाझप, झरझर, त्वरीत.
चट्टाडाग, वण, व्रण.
चतुराननब्रह्मदेव.
चंदावर्गणी.
चंद्रइंदू, इंद्र, कलानिधी, चंद्रमा, नक्षत्रेश, निशाकर, निशानाथ, निशापति, रजनीनाथ, विधू, शशधर, शशांक, शशिधर, शशी, शाशांक, शुभ्रांशू, सुधाकर, सुधांश, सुधांशू, सोम, हिमांशु, हिमांशू.
चंद्रामृतचंद्रकिरणरुपी अमृत.
चपगप्प, चीप, चूप, शांत, स्तब्ध.
चपलचलाख, तल्लख, वेगवान, हुशार.
चपलावीज.
चप्पलजोडा, पादत्राण, पायतण, पायताण, वहाणा.
चबुतराउंचवटा, ओटा, कट्टा, चौथरा.
चमूगट, समूह.
चरणपद, पाऊल, पाय.
चरितार्थउदरनिर्वाह.
चलोगीसंपलेले.
चवआस्वाद, गोडी, रूची, स्वाद.
चाकचक्र.
चाकरगडी, गुलाम, दास, नोकर, सेवक.
चांगलेमनोहर, सभ्य, सुंदर.
चाचणीतपासणी, परीक्षा, पारख.
चाटास्वच्छंदी.
चाडआवड, गरज, गोडी.
चाणाक्षचतुर, चलाख, चालाख, धूर्त, हुशार.
चांदणेकौमुदी, चंद्रप्रकाश, चंद्रिका, ज्योत्सना, ज्योत्स्ना.
चांदीरूपे.
चारुमोहक.
चारूमोहक.
चालिंदरतंत्र, तहा.
चाहुलअंदाज, कानोसा, सुगावा.
चिकणमातीचिपळी, चोपण, चोपणी, भिंगोळ, माढा, माण, मुलतानी, शाडू.
चिंताकाळजी, खंत, फिकीर, विवंचना.
चित्तवृत्तीमनःस्थिती, मनाच्या लहरी.
चिमुकलेइवलेसे, छोटे, लहान, सान.
चिरंजीवपुत्र.
चिलटडास, मच्छर, मशक.
चिल्लापिल्लीकच्चीबच्ची, पोरे, बालबच्ची, मुलेबाळे.
चिळकांडीचिपनळी, चिरकांडी, पिचकारी.
चिळसकिळस, तिटकारा, तिरस्कार, वीट.
चिवटचामट, चिकट, वातड.
चुटपुटकाळजी, खुरस्तुर, चडफड, तळमळ, हुरहुर.
चूरगर्क, गुंग, तल्लीन, मग्न.
चेपणेआवळणे, दाबणे, पिळणे.
चेष्टाउपहास, कुचाळी, खिल्ली, गंमत, चकाट, चेवांडी, छटपट, टर, टवाळी, तमाशा, थट्टा, नालस्ती, मजा, मस्करी, विनोद.
चेहराचर्या, तोंडावळा, मुख, मुद्रा, रूप.
चोरटाउचल्या, गनीम, गलीम, गिराशी, ग्रंथीमोचक, चलान, झोंबाडा, डाकू, दस्यू, पाळेगार, पुंड, बर्गा, बैद, भड्या, भामटा, मवास, लुटारू, वरपेकरी, वाटघेणा, हरक, हागे.
चौकशीविचारपूस.
चौचालभटक्या, भणंग, लहरी, स्वच्छंदी.
छकडीसहा संख्येचे माप.
छटाझाक, शैली.
छडातपास.
छंदआवड, नाद, शोक.
छंदिष्टलहरी.
छांदिष्टयनादी, लहरी.
छानउत्तम, सुंदर, सुरेख.
छिद्रभोक.
छेदणेकापणे, चिरणे, छाटणे, तोडणे.
जगजगत, जगत्, दुनिया, भुवन, भूलोक, मृत्युलोक, विश्व, विष्प्र.
जंगलअरण्य, कानन, रान, विपीन.
जडआळशी, मंद, मूर्ख.
जत्रामेळा.
जनमाणसे, लोक.
जनकपिता, वडील.
जननजन्म.
जन्मदात्रीआई, जननी, जन्मदा, माऊली, माता, माय.
जमीनकाळी आई, धरणी, धरती, धरा, धरित्री, भुई, भू, भूमी.
जययश, यशस्वी, विजय, सफल, सिद्धी.
जरठजीर्ण, म्हातारा, वृद्ध.
जरबजरब, दबदबा, दरारा, दहरात, दहशत, धाक, वचक.
जलअंबू, उदक, जीवन, तोय, नीर, पय, पाणी, वारी, सलील.
जलदताबडतोब, त्वरेने, लवकर, शीघ्र.
जलालउग्र, कडक, जहाल, जालीम, तापट, तिखट, तिखटजाळ, तीक्ष्ण, तीव्र.
जलाविणजलाविणाचा, पाण्याशिवाय.
जलीलवैभवसंपन्न.
जवळतिकट, नजीक, संनिध, समीप, सानिध्य.
जवाहीरअलंकार, आभरण, जडजवाहीर, रत्ने, सोने.
जहरगर, विख, विष.
जहालतापट.
जागरूकजागृत, दक्ष.
जागाठिकाण, स्थळ, स्थान.
जाडदांडगा, धष्टपुष्ट, लठ्ठ, स्थूल.
जात्यंधजन्मापासून अंध.
जादूइंद्रजाल, मंत्रतंत्र, मंत्रविद्या.
जानपदग्रामीण जीवन.
जान्हवीगंगा नदी.
जायाबायको.
जाहीरप्रगट, प्रसिद्ध, सर्वश्रुत.
जिगरजिवलग, जीवश्चकंठश्च, प्यारा, प्रिय.
जिणेअस्तित्व, आयुष्य, जीवन, जीवीत.
जिद्दआग्रह, दुराग्रह, हट्ट, हेका.
जीभअरूधती, जबान, जिभली, जिव्हा, जिहया, रसना, रसनेंद्रिय, रसवंती, लुघत, वाचा, वाणी, वैखरी.
जीवप्राण.
जीवन१. आयुष्य, हयात. २. पाणी.
जुगेपुष्कळ.
जुनाजीर्ण, पुरातन, प्राचीन.
जुलूमअत्याचार, अन्याय, छळ, जबरदस्ती, बळजोरी.
जेमनभोजन.
जेवणआहार, जेमन, भोजन.
जोखडकाळजीचे ओझे.
जोखीमजबाबदारी, धोका, हमी.
जोतिष्यकुंडली, जातक, भविष्य, भाकीत.
ज्ञाताजाणकार, जाणणारा, ज्ञानी, डोळस, तज्ज्ञ, विद्वान, शहाणा, सुज्ञ.
ज्ञानबुद्धी, विद्या.
ज्योतिषीगणक, गणिक, जोशी, नखतरी, नजुमी, नबी, पिंगळा, फालपार, बाडी, मुळिया, मुळे, मेंडग्या, सरोदा, हस्तसामुद्रिक.
झकपकचकाळी, चमक, झगमग, झळक.
झगडाकलह, झुंज, तंटा, भांडण, वाद, संघर्ष.
झंझावाततुफान, वादळ, वावटळ.
झडतीतपास, तपासणी, शोध.
झपाझपजलद, झटपट, झरझर, लवकर.
झरणेझिरपणे, पाझरणे, वाहणे.
झराओढा, ओहळ, निर्झर.
झरोकाखिडकी, गवाक्ष, जाळी, झरूका.
झळनुकसान, हानी.
झाडअगम, गुल्म, झुडूप, तरू, दृम, द्रुम, पादप, रूख, वनस्पती, विटप, वृक्ष, शाखी.
झांबडजड, बैडोल, लुट.
झाबडवृद्ध.
झीटघेरी, भोवळ, मुच्र्छा.
झुंजयुद्ध, लढा, संगर, संग्राम, संघर्ष.
झुंबडगर्दी, जमाव, थवा, दाटी, रीघ.
झेंडाध्वज, निशाण, पताका.
झेपउडी, उड्डाण, सूर.
झोकणेकलणे, झुकणे, वाकणे.
झोकाझुला, झोपाळा, दोला, हिंदोळा.
झोपनिद्रा, नीज, शयन.
टकळीबडबड, रडारड, वटवट.
टंगळमंगळटाळाटाळ, दिरंगाई, हयगय.
टणककणखर, बळकट, मजबूत.
टरफलआवरण, ओंड, कंचुक, कर्ल, कळपा, कवच, कोश, खवळी, खाल, खोळ, चकदा, चिथडे, छिलका, पापुद्रा, साल, सालपट.
टवटवीतताजा, तेजस्वी, प्रफुल्लित, सतेज.
टाकाऊकुचकामी, गुणहीन, निरुपयोगी, व्यर्थ.
टापूटप्पा, प्रदेश, प्रांत.
टाळाजबडा.
टाहोआक्रोश, हंबरडा.
टैलऐट.
टोलेगंजअजस्त्र, प्रचंड, भव्य.
ठकमवाली, लबाड.
ठकारसुंदर.
ठकोरकार्यक्रम.
ठगफसवा, भामटा, लुच्चा, लुटारु.
ठरावकबुली, करार, निश्चय, बोली, वाचन.
ठामखचित, दृढ, निर्विवाद, निश्चित, बिनचूक.
ठावखोली, तळ, बूड.
ठीकउचित, बरोबर, योग्य, सम्पर्क.
ठेकाआवाज, ताल, ताळ.
ठेवनिधी, संचय, साठा.
ठोंब्यामंद बुद्धीचा.
ठोसातडाखा, धपाटा, रपाटा.
डबराखळगा, मारक.
डवलागर्व, तोटा.
डाकूचोर, दरोडेखोर, लुटारू.
डोकेकपाळ, टकले, डोई, डोस्के, मस्तक, माथा, मूर्धा, शिर, शीर, शीर्ष, शीश.
डोंगरअचल, अद्री, गिरी, नग, पर्वत, शैल.
डोळाअक्ष, अक्षी, अंबक, आँख, आखत, आवाळू, ईशण, चक्षू, चश्म, नजन, नयन, नहिना, नेत्र, लोचन.
डोळेअक्ष, अक्षी, अंबक, आँख, आखत, आवाळू, ईशण, चक्षू, चश्म, नजन, नयन, नहिना, नेत्र, लोचन.
डोहळेतीव्र इच्छा.
डौल१. दिमाख, ऐट, तोरा, नखरा, रुबाब, वट. २. मांडणी.
डौलदारचांगल्या घाटाचा, मोहक, सुंदर.
ढग१. अंबुद, अबुद, अब्द, अभ, अभ्र, आद्र, आभाळ, घन, जलद, जलधर, जलन, तोमर, तोयद, नीरद, पयोद, पयोधर. २. लुटारु, मेघ.
ढवळाढवळउलाढाल, गोंधळ, लुडबूड.
ढिगाराढीग.
ढिलाअघळपघळ, मऊ, सैल.
ढीगरास.
ढेकूणखटमल, मत्कुण.
ढोंगपाखंड, लबाडी, सोंग.
ढोरइ.), गुरे, जनावरे (गाय, बैल, म्हैस, रेडा.
ढोलालठ्ठ.
तकलादीतकलुबी, नकली, बनावट.
तकवाजोर, ताकद, बळ, शक्ती.
तक्ताकोष्टक, नकाशा.
तख्तआसन, गादी, तक्त, सिंहासन.
तगडाधट्टाकट्टा, धिप्पाड, बळकट, सशक्त.
तजवीजव्यवस्था.
तजावजउल्लंघन.
तज्ज्ञजाणकार.
तज्ञकुशल, जाणता, पंडित, माहितगार.
तटकिनारा.
तटाकतलाव.
तटिनीनदी.
तड१. अडचण, अखेर, तंगी. २. शेवट.
तडकआवेग, गती, जोर, नेट, वेग.
तडजोडसमेट, सलोखा.
तडफउत्साह, चपलता, चलाखी.
तडबखचाखच, भरपूर.
तडाचीर, फट, भेग.
तडागतलाव, दरवाजा, दार.
तडितविद्युत.
तणगवत.
तंतुदोरा, धागा, सूत, सूत्र.
तनअंग, काया, तनू, देह, शरीर.
तनयपुत्र.
तनूशरीर.
तपआचरण, ध्यान, मनन.
तपासचौकशी, तलास, विचारपूस, शोध.
तफावतअंतर, फरक.
तमोपगुणीतामसी, शीघ्रकोपी.
तरतूदयोजना, व्यवस्था, सिद्धता.
तरबेजकुशल, निपूण, निष्णात, पारंगत, वाकबगार.
तरूवृक्ष.
तर्‍हापद्धती, मार्ग, रीत.
तलवारकृपाण, खडग, खड्ग, समशेर.
तलावकांतार, कासार, जलाशय, तटाक, तडाग, तळे, पुष्करिणी, सरोवर, सारस, सारस.
तळेतडाग, तलाव, सरोवर.
तसवीरचित्र, छबी, तसवीर, प्रतिमा.
तहीमसंशय.
ताकीदजबर, जरब, दरारा, समज, हुकूम.
ताजवातराजू.
ताडाजुळणी, ताळा, मेळ.
तातपिता.
तांतबारिक दोरा.
तारणरक्षण.
तारांबळघाई, धांदल.
तारीफप्रशंसा, वाखाणणी, वाहवा, स्तुती.
तारुगुलबत, जहाज.
तारुण्यजवानी, ज्वानी, यौवन.
तारूगलबन, जहाज, नाव, नौका.
तारूण्यजवानी, तरूणपणा, यौवन.
तालठेका.
तालीकैवारी, रक्षणकर्ता.
तालेवारधनिक, श्रीमंत.
तांशहिंमत.
तिमिरअंधार.
तिरपीटघाई, तारांबळ, त्रेधा, धांदल.
तिरसटचिडका, चिडखोर, तुसडा, त्रासिक.
तीरकाठ, किनारा, तट.
तीर्थरूपवडील.
तीव्रउग्र, कडक, प्रखर, भयंकर.
तुंडतोंड.
तुंदिलतूनढेरपोट्या, लंबोदर.
तुरगअश्व.
तुरुंगकैदखाना, बंदिवास.
तुलनासाम्य.
तृक्षझाड, तरु, पादप, विटप, सुम.
तृणगवत.
तृप्तसंतुष्ट, समाधानी, सुखी.
तृप्तीतुष्टी, तृप्तता, तोष, प्रसन्नता, संतोष, समाधान.
तृषाइच्छा, तहान, तृष्णा.
तृष्णातहान, लालसा.
तेजआभा, उजेड, तेजस्वी, तेजोमय, प्रकाश, प्रभा.
तेजःपुंजतेजस्वी, तेजोनिधी, देदीप्यमान.
तेजीमंदीनफा-नुकसान, फायदा-तोटा, लाभ-हानी.
तोटानुकसान, हानी.
तोंडआनन, चर्या, चेहरा, तुंड, मुख, मुद्रा, वक्त्र, वदन.
तोराऐट, डौल, दिमाख, नखरा.
तोषसंतोष, समाधान.
त्रेधाधांदल.
त्वचाकातडी.
त्वाटाब्रम्हदेश.
त्वेषआवेश.
थकणेदमणे, भागणे, शिणणे, श्रमणे.
थकवाशीण.
थक्कअचंबा, आश्चर्य, नवल, विस्मय.
थट्टाचेष्टा, मस्करी, विनोद.
थंडगार, शीत, शीतल.
थंडीगारठा, गारवा.
थवागर्दी, चमू, जमाव, समदाय, समूह.
थांगठाव, तळ, पत्ता, माग.
थाटडामडौल, थाटमाट, शोभा.
थाळाताट, परात, पात्र.
थिटाअपुरा, अरूंद, आखूड.
थीरनिवांत, शांत, सौम्य, स्तब्ध.
थेटनीट, बरोबर, योग्य, सरळ.
थोडाअल्प, किंचित, थोडका.
थोरपूज्य, मोठा, श्रेष्ठ.
दक्षसावध.
दगडखडक, गोटा, धोंडा, पाषाण, फत्तर, शिला, शिळा.
दंडकाठी, छडी, दंडा, सोटा.
दत्तअत्रिनंदन, अत्रिसुत, दत्तदिगंबर, दत्तात्रेय.
ददातउणीव.
दरवाजाकवाड, दार.
दरिद्रीकंगाल, कफल्लक, खंक, खंकळपाळ, खंख, खणखणपाळ, गरीब, दीन, निर्धन, निष्कांचन, रंक.
दर्पणआरसा.
दशजदीर्घायू.
दागिनाअलंकार, आभरण, आभूषण, भूषण, विभूषण.
दाटगर्द, घट्ट, घन, निबिड.
दांतदंत, द्विज (दोनदा जन्मलेला), रदन.
दातदंत, द्विज, रुदन.
दानवराक्षस.
दानीउदार, उदारधी, दाता, दानशूर.
दामपैसा.
दारकवाड, ताटी, दरवाजा, द्वार.
दाराबायको.
दारिद्र्यगरिबी, दैन्य.
दावहक्क.
दाहकजाळणारा.
दिवसअन्ह, अह, दिन, दिस, वार, वासर.
दिवादीप, दीपक.
दिव्यतेजस्वी.
दुःखअवसाद, क्लेश, क्षोभ, खेद, पीडा, यातना, शोक.
दुःखीकष्टी, खिन्न, त्रस्त.
दुनियाइहलोक, जग, पृथ्वी.
दुनोदोघांत.
दुबळाअशक्त, दुर्बल, सामर्थ्यहीन.
दुर्गकिल्ला, कोट, गढी.
दुर्जनअनुदार, अभद्र, असाध, दुष्ट, नीच.
दुर्दैवदुर्भाग्य.
दुर्दैवीअभागी, दुर्भाग्यशाली, दैवहीत, भाग्यहीत.
दुर्धरअवघड, कठीण.
दुर्बोधअनाकलनीय.
दुर्भाग्यदुर्दैव.
दुर्भिक्षउणीव.
दूधक्षीर, क्षीर, दुग्ध, पय, पेय.
दूरस्थदूर राहणारा, राहणारी.
दृढपाशपक्के संबंध.
दृष्टीदृष्ट, नजर, नदर.
देऊळदेवघर, देवस्थान, देवालय, मंदिर, राऊळ.
देखणीरूपवती, सुंदर, सुरूप.
देखणेसुंदर.
देखावादृश्य.
देवअमर, ईश, ईश्वर, त्रिदश, निर्जर, परमेश्वर, प्रभू, भगवान, विबुध, सुर.
देशराष्ट्र.
देहअंग, अंगकाठी, काया, तन, तनु, तनू, वपु, वपू, शरीर, शरीरयष्टी.
देहान्तमरण.
दैत्यअसुर, दानव, राक्षस.
दैन्यगरिबी, हलाखी, हीनपणा.
दैवतकदीर, नशीब, प्रारब्ध, भाग्य, ललाट.
दौलतधन, संपत्ती.
द्वेषमत्सर, राग, हेवा.
धंदाउदीम, उद्योग, व्यवसाय, व्यापार.
धनअर्थसंचय, जडजवाहीर, दौलत, द्रव्य, धन, पैसा, पैसा, लक्ष्मी, वित्त, संपत्ती, संपदा.
धनगरपाळक, भरवाड, मेंडका, मेंढपाळ, राखण्या, शेरडुकल्या, शेळक्या.
धनंजयअर्जुन.
धनिकधनवान, धनाड्य, श्रीमंत, सावकार.
धनीपती, मालक, स्वामी, हेतू.
धनुष्यकमठा, कार्मुक, कार्मुक, कोदंड, चाप, तिरकमठा, तिरकामठा, तीरकमठा, धनू.
धनुष्यदोरीचिल्ला, झी, प्रत्यंचा, मौर्वी, रोदा, वोढी, शीत, सीत.
धरणीधरगणपती.
धरतीधरणी, धरा, धरित्री, भू, भूमी, भूमी.
धरित्रीपृथ्वी.
धवलपांढरा, पांढरे, शुभ्र.
धाकजरब.
धिटाईधाडस, धीटपणा, धैर्य, हिम्मत.
धीरधैर्य.
धुंबडदंगा.
धूकूडपुकूडधडधड, धाकधूक.
धूर्तअरकाट, कसबाती, कसबी, कावेबाज, चतुर, चलाख, चाणाक्ष, चालाख, लबाड, लुच्चा.
धूळधुरळा, माती, रजःकण.
ध्यानचिंतन.
ध्यासपंथेध्येयाच्या मार्गाने.
ध्येयउद्दिष्ट, हेतू.
नजरदृष्टी.
नंदनपुत्र.
नंदिनीआत्मजा, कन्या, तनया, तनुजा, दुहिता, मुलगी, सुता.
नदीआपगा, कल्या, जलवाहिनी, जलसाहिनी, तटिनी, तरंगिणी, नद, निर्झरिणी, सरिता.
नफाफायदा.
नभअंबर, आकाश, आभाळ, गगन.
नमस्कारअभिवादन, नमन, नमा, प्रणिपान, प्रतिपात, वंदन.
नमुनामासला.
नवनवीन, नवे, नूतन.
नवराअंबुला, कवेश, कांत, कान, दादला, धन, धनी, धव, नाथ, पती, प्रभू, प्राणनाथ, भती, भरतार, भर्तार, भ्रतार, वल्लभ, वल्लम, स्वामी.
नवलअचंबा, अप्रूप, अलौकिक, आक्रित, आचीर, आश्चर्य, कवतिक, कुतूहल, नव्हाळी, विचुंबा, विस्मय.
नवीननव, नूतन.
नाखवानावाडी.
नांगरऔत.
नाचनृत्य.
नाचारकंगाल, गरीब, दरिद्री, लाचार.
नाजूककोमल, नरम, मुलायम.
नातेआप्तपणा, नातलग, रक्तसंबंध.
नातेवाईकनातलग.
नादआवाज.
नांदतीनांदतात.
नानीलहान.
नापासअनुत्तीर्ण, अमान्य, अयशस्वी.
नामीचांगला.
नायकअग्रणी, नेता, पुढारी, म्होरक्या.
नारळनारिकेल, नारियल, श्रीफळ.
नारीअंगना, अबला, कामिनी, प्रमदा, महिला, रमणी, ललना, वनिता, स्त्री.
नालाअरा, ओघ, ओढा, ओहोळ, नागझरी, निर्झर, पर्या, पहाळ, पाबळ, प्रणालिका, प्रवाह, मोघल, रवाळ, लेंडी, विर्‍हा, सारण.
नावगलबत, जलयान, तर, तरणी, नौका, होडी.
निकडतगादा, लकडा, हव्यास.
निकसनिकृष्ट.
निखळशुद्ध.
निखालसनिश्चित, साफ, स्पष्ट.
निढळकपाळ.
नित्यनेहमी, सतत, सदा, सदोदित.
निधनअंत, मरण, मृत्यू.
निपुणकुशल, निष्णात, प्रवीण.
निबंदमोकाट.
निबिडगडद, घनदाट, दाट.
निमंत्रणआमंत्रण, आवतण, बोलावणे.
नियमकायदा, चाल, पद्धत, रीत, वहिवाट.
निर्जनओसाड.
निर्धारखातरी, निश्चय, विश्वास, संकल्प.
निर्मळपवित्र, मंगल, स्वच्छ.
निर्वाहउपजीविका.
निलाजरानिर्लज्ज, बेशरम.
निशाणझेंडा, ध्वज.
निशानाथचंद्र.
निश्चयदृढता, निग्रह, निर्धार.
निष्ठाश्रद्धा.
निष्णातकुशल, निपुण, पटाईत, प्रवीण, प्रवीण.
नीरपाणी.
नीरजकमळ.
नुकसानखोट, तोटा, हानी.
नुपूर१. उणिव. २. पैंजण.
नृत्यनर्तन, नाच.
नृपनरेंद्र, नरेश, प्रजापती, भूप, भूपती, भूपाल, राजा, लोकपाल.
नेकचांगला, प्रामाणिक, सरळ.
नेहमीसतत, सदा.
नोकरआर्यिक, उलिंग, उलिंगी, किंकर, चाकर, दास, मोलकर, रामागडी, सेवक.
नोकराणीकामवाली, दासी, बटिक, मोलकरीण, सेविका.
नौकाहोडी.
नौबतकीर्ती, डंका, नगारा, प्रसिद्धी.
न्यूनताउणीव, कमतरता.
न्हंगडंआजारपण.
न्हावीअंतावसायी, आयकरी, दिवाकीर्ती, नापित, न्हाऊ, पालट्या, महालदार, महाल्या, माली, मुंड, वारिक, श्मश्रुवर्धन, सन्मुख, हजाम.
पंकचिखल.
पंक्तीओळ, पंगत, रांग.
पक्षपातअसमदृष्टी.
पक्षीअंडज, खग, द्विज, द्विज, पाखरू, विहग, विहंग, विहंगम, शकुन्त.
पगडाअधिकार, वर्चस्व, सत्ता.
पगापाहा, बघा.
पगारतनखा, मेहनताना, वेतन.
पंडीततज्ञ, विद्वान, शास्त्रज्ञ.
पणतीदिवलाणी, दिवली.
पंतसंप्रदाय.
पतितदुर्गुणी.
पतीअंबुला, आर्यपुत्र, कवेश, कांत, घरधनी, घरमालक, दादला, धनी, धव, नवरा, नाथ, पतिराज, भ्रतार, मालक, यजमान, रमण, वल्लभ, सहचर, स्वामी.
पत्नीअंतुरी, अंबुली, अर्धांगिनी, अर्धांगी, अलावत, अस्तुरी, अहिवा, अहेव, आर्या, कलत्र, कलम, कांता, कान्ता, कांन्ता, गृहस्वामीनी, गेहिनी, घरवाली, जाया, दारा, धनीण, बाईल, बायको, भार्या, मंडळी, मालकीण, वामांगी, सखी, सधवा, सहचरी, सहधर्मचारिणी, सुवासिनी, सौ, सौभाग्यवती, स्वामिनी.
पत्रटपाल.
पथमार्ग.
पंथपथ, मार्ग, रस्ता, वाट.
पथारीअंथरूण, बिछाना, शय्या, शेज.
पद१. पाय, चरण, पाऊल, पाद २. काव्य, श्लोक.
पदवीकिताब, कीर्ती, बिरूद.
पद्धतआचार, चाल, प्रघात, रिवाज, रीत.
पद्मकमळ.
परकाअनोळखी, अपरिचित.
परंतुकिंतु, पण, लेकिन, लेकीन, शिवाय.
परमश्रेष्ठ.
परमार्थब्रह्म, ब्रह्मज्ञान, मोक्ष.
परवानगीमान्यता, मुभा, संमती.
पराक्रमपौरुष, प्रताप, बहादुरी, विक्रम, वीरता, शौर्य.
पराणीआर, टोचणी.
परिचयओळख.
परिश्रमकष्ट, महेनत, मेहनत, श्रम.
परीक्षाकसोटी.
पर्णपान.
पर्वतअचल, अद्र, अद्रि, अद्री, गिरी, डोंगर, धरणीधर, धराधर, नग, भूधर, भूमिधर, महीधर, मेरु, मेरू, शैल.
पर्वाकाळजी, चिंता, धास्ती.
पल्लवकोवळे पान (पालवी).
पवित्रनिर्मल, पावन, विमल, शुची, शुद्ध.
पहाटउषःकाल, उषा.
पाऊसपर्जन्य, वरुण, वर्षा, वर्षाव, वृष्टी.
पाणीअंबू, अंभ, अंभ, अमृत, आप, उदक, क्षीर, जल, जीवन, तोय, नीर, नीर, पय, वारि, वारी, सलिल, सलील.
पात्रताट, भांडे, योग्य, लायक.
पानदल, पत्र, पत्र, पत्री, पर्ण, पल्लव.
पापअपकर्म, कुकर्म, दुरित, दुरीत, दुष्कृत, दुष्कृत्य, पातक.
पायचरण, टांग, तंगड, तंगडी, पद, पाउल, पाद.
पायाशुद्धमूलभूत.
पारंगतनिपुण.
पारितोषिकइनाम, बक्षीस.
पार्वतीअपर्णा, अंबा, अंबाबाई, अंबाभवानी, अंबिका, उमा, कन्याकुमारी, कात्यायनी, कालिका, कालिमाता, काली, गिरिजा, गौरी, चामुंडा, जगत-जननी, जगदंबा, दुर्गा, देवी, भवानी, महदंबा, महादेवी, महेश्वरी, रुद्राणी, शक्ती, शांतादुर्गा, शिवांगी, शिवानी, शैलजा, श्वरी, सती, हेमवती, हेमा.
पावननिर्मळ, पवित्र, शुद्ध.
पावरीअलगूज, पावा, बासरी.
पाशबंधन.
पाहुणाअतिथी.
पिककोकीळ.
पिताजनक, जन्मदाता, तात, बाप, वडील.
पीयुषअमृत.
पुढारीअग्रणी, आगेवान, खोलता, ताज, दावेळा, नायक, नेता, भूमका, भोयाळ, मव्हर, मिरधा, मेहतर, म्हारकांडो, म्होरक्या, वाटकाढू, सगवई, सरता, हादी.
पुण्यश्रेयस, सत्कर्म, सुकृत.
पुण्यश्लोकसुकीर्तीमान.
पुतळाप्रतिमा, बाहुले.
पुत्रआत्मज, चिरंजीव, तनय, तनुज, नंदन, पुतुर, पूत, पोर, पोरगा, बालक, बाळ, मुलगा, सुत.
पुरंदरइंद्र.
पुरातनप्राचीन.
पुरुषगडी माणूस, नर, पुरुषमाणूस, बुवा, मनुज, मनुष्य, मर्द, माणूस, मानव.
पुरूषगडी माणूस, नर, पुरुषमाणूस, बुवा, मनुज, मनुष्य, मर्द, माणूस, मानव.
पुष्पकुसूम, फूल, सुम, सुमन.
पुस्तकग्रंथ, पोथी.
पूजाअर्चन, आर्चा, उपासना, सेवा.
पृथ्वीअवनी, उरवी, कुंभिनी, क्षमा, क्षिती, जमीन, धरणी, धरती, धरा, धरित्री, भवनी, भू, भूमी, मही, मेदिनी, रत्नगर्भा, रसा, वसुंधरा, वसुधा, वसुमती, विश्वंभरा.
पोटउदर, ढेरी, पोटाची खळगी.
पोपटकीर, राघु, राघू, रावा, शुक.
पोरकानिराधार.
पोशिंदापोसणारा.
प्रकाशउजेड, तेज.
प्रघातचाल, पद्धत, रिवाज, रीत.
प्रचंडअजस्त्र, अवाढव्य, महान, विशाल, विस्तृत.
प्रचीतीअनुभव, खात्री, पडताळा, प्रत्यय.
प्रजाजनता, रयत, लोभ.
प्रजापतीब्रह्मदेव.
प्रतनक्कल.
प्रतापपराक्रम, बहादुरी, विक्रम, शौर्य.
प्रतिज्ञानेम, पण, प्रण, वचन, शपथ.
प्रतिष्ठासन्मान.
प्रतीकखूण, चिन्ह.
प्रत्यहीप्रतिदिन.
प्रदेशप्रांत, मुलूख.
प्रद्यातचाल, पद्धत, परंपरा, रीत.
प्रबंधउपाययोजना, तजवीज, व्यवस्था.
प्रबळबलवान, बलशाली, शक्तीशाली, समर्थ, सामर्थ्यवान.
प्रमोदआनंद.
प्रलोभनलाच.
प्रवासदौरा, परिभ्रमण, पर्यटन, फिरती, फेरफटका, भ्रमण, यात्रा, रपेट, वाटचाल, विहार, सफर, सहल.
प्रवासीपांथ, पांथस्थ, वाटसरू.
प्रवाहओघ.
प्रवीणकुशल, चतुर, तरबेज, निपुण, निष्णात, निष्णात, पटू, हुशार.
प्रशंसावाखाणणी, वाहवा, शाबासकी, स्तुती.
प्रसिद्धख्यातकीर्त, ख्यातनाम, नामांकित, प्रख्यात, विख्यात.
प्रसिद्धीअशकारा, अस्करा, आख्या, आढ्यता, औसाफ, कीर्ती, ख्याती, गाजावाजा.
प्राक्तननशीब.
प्राचीपूर्व दिशा.
प्रांजळाचेप्रामाणिकपणाचे.
प्राणआत्मा, जीव, श्वास.
प्राणीजनावर, जीव, पशू, वनचर.
प्रामाणिकपणाइमानदारी.
प्रारब्धदैव, नशीब.
प्रारंभआरंभ, सुरुवात.
प्रार्थनास्तवन.
प्राविण्यकरामत, कसब, कौशल्य, खुबी, चातुर्य, नैपुण्य.
प्रासाददेऊळ, मंदिर, महाल, राजमंदिर, राजवाडा, वाडा.
प्रेमअनुरक्ती, अनुराग, जिव्हाळा, प्रणय, प्रीती, प्रेमा, ममता, माया, लोभ, सौहार्द, स्नेह.
प्रेरणास्फूर्ती.
प्रेषितदेवदूत.
प्रोत्साहनउत्तेजन.
फजीतओशाळलेले, लज्जित, विरमलेले.
फटचीर, तडा, भेग.
फटांगफट्ट.
फडतूसक्षुद्र, गचाळ, टाकाऊ.
फणकारआघात, तडाखा, प्रहार, सपाटा.
फत्तेजय, यश, यशस्वी, सरशी.
फरकअंतर, तफावत, भिन्नता, भेद.
फर्मानआज्ञापत्र, राजपत्र, सनद, हुकूम.
फलकफळा.
फांदीशाखा.
फायदाकिफायत, नफा, लाभ.
फाल्गुनअर्जुन.
फितूरदगाबाज.
फिदाखूष, प्रसन्न, संतुष्ट.
फुकटनिरर्थक, फुका, मोफत, व्यर्थ.
फुलोराबहर, मोहोर.
फुशारकीआत्मस्तुती, बढाई, शेरसी.
फूलआरल, उळ, कुसुम, पुष्प, फुल्लार, माल्य, शगुफ, सारंग, सुम, सुमन.
फैलावप्रसार.
फैसलानिकाल, निर्णय, निवाडा.
फोडउठाणू, गळू, बेंड.
फोलनिरर्थक, निष्फळ, पोकळ, रिकामे, व्यर्थ.
बकबगळा.
बक्षीसपारितोषिक.
बखरइतिहास, चरित्र, बातमी, हकीकत.
बगळाबक, बलाक.
बजरंगपवनपुत्र, मारुती, हनुमान.
बटीककुणबीण, दासी, मोलकरीण.
बंडअराजक, गडबड, गोंधळ, दंगा.
बडगादंडुका, सोडगा, सोहा.
बदलकलाटणी, फेरफार.
बंदारातलाव.
बंदीआडकाठी, प्रतिबंध, मज्जाव, मनाई.
बंदोबस्ततजवीज, प्रबंध, व्यवस्था.
बद्धबांधलेला.
बंधनअडथळा.
बंधूभय्या, भाई, भाऊ, भ्राता, सहोदर.
बरकतभाग्य, लाभ, सुदैव.
बरखास्तविसर्जित, संपणे, समाप्त.
बरदास्तआदरसत्कार, निगा, पाहुणचार.
बरवेंचांगले.
बरोबरयोग्य, सम, समान, सारखा.
बर्फहिम.
बळक्षमता, जोम, जोर, ताकद, शक्ती, सामर्थ्य.
बहाणाढोंग, मिष, सोंग.
बहादूरधाडसी, धीट, वीर, शूर.
बहीणअग्रजा, अनुजा, ताई, भगिनी, सहोदरा, सहोदरी, स्वसा.
बागउद्यान, उपवन, पुष्पवन, पुष्पवाटिका, पुष्पवाटिका, फुलबाग, फुलोद्यान, बगिचा, बगीचा, वाटिका.
बाणइषू, तीर, शर, सायक.
बातमीआवई, मजकूर, वार्ता, वृत्त, वृत्तांत, संदेश, हकीकत.
बादशहासम्राट.
बांधेसूदरेखीव, सुडौल.
बापअंबक, जनक, जन्मदाता, तात, तीर्थरूप, पिता, पिताश्री, बाबा, वडील.
बारीकबारका, लहान, सूक्ष्म.
बालकअर्भक, बाल, मूल.
बाळबालक.
बावटाध्वज.
बिकटअवघड, कठीण, त्रासदायक, दुर्लभ.
बिगरखेरीज, वाचून, शिवाय.
बिछानाअंथरूण, आधातुरी, गादी, तुलई, तोषक, पाटोळी, बिछायत, मंचक, शय्या, शेज.
बिनीआघाडी.
बियाणेबी, बीज.
बीजमंत्रमूळ, सूत्र.
बुटकाआखूड, खुजा, गिड्डा, ठेंगणा, ठेंगू.
बुद्धीधी, प्रज्ञा, प्रज्ञा, मती, मेधा.
बेअदबीअपमान.
बेगडीतकलादू.
बेडूकदर्दुर, बॅबॉ, बेडकी, भेक, मंडूक.
बेतआखणी, योजना.
बैलखोंड, पोळ, वृषभ.
बोटअंगुली, गलबत, होडी.
बोलणेगिरा, वाच्चा, वाणी.
ब्रह्मजगत्कारण, परब्रह्म, सत्तत्व.
ब्रह्मदेवकंज, कमलासन, चतुरानन, प्रजापती, ब्रह्मा, विधाता, विधी, विरंची.
ब्राह्मणद्विज, विप्र.
भक्कमटिकाऊ, बळकट, मजबूत.
भक्षणखाणे.
भयघबराट, भीती.
भरभराटअभ्युदय, उत्कर्ष, उवाव, चलती, प्रगती, विकास, विपुलता, संपन्नता, समृद्धी, समृद्धी, सुबत्ता.
भरवसाविश्वास.
भराभरजलद, झरझर, पटापट, शीघ्र.
भस्मरक्षा, राख, विभूती.
भाऊअग्रज, अनुज, दादा, बंध, बंधू, भावड्या, भ्राता, सहज, सहोद, सहोदर.
भाग्यदैव, नशीब, प्रारब्ध.
भाटस्तुतिपाठक.
भांडखोरकलभांड, कलहप्रिय, कलागती, कळिकंटा.
भांडणकज्जा, कलह, झगडा, तंटा, संघर्ष.
भांडारसंग्रहालय, साठा.
भानशुद्ध.
भारतआर्यभूमी, आर्यावत, आर्यावर्त, भरतखंड, भारतभूमी, भारतवर्ष, हिंददेश, हिंदुस्थान, हिदेश, हिदोरता.
भारतीभाषा, वैखरी.
भाळकपाळ.
भाषागिरा, भारती, वाणी.
भास्करसूर्य.
भिकारीअर्थेला, आजीवळ, झोळीबंद, तिरडोळी, दानीय, भिकेसवता, भिक्षुक, भिक्षेकरी, माकतेकरी, याचक, संघजीवी, सरोदा.
भीतीघबराट, धास्ती, भय.
भुंगाअली, बंभर, भृंग, भ्रमर, मधुकर, मधुप, मिलिंद, षटपद, षट्पद.
भुजाबाहू.
भूपराजा.
भूलभुरळ.
भेगआडफट, खाच, चीण, चीर, जिवणी, तडा, दरज, दरी, दोरवा, धाळ, निमूर, फट, भेताळा, रेभ, वाभारा, विच, शिवर, संधी, सांदण.
भेदअंतर, फरक, विभक्त, विभागणे.
भेदभावफरक.
भोजनजेवण.
भोरपीबहुरुपी.
भ्रमंतीप्रवास, फेरफटका, भटकंती, सफर.
भ्रमरभुंगा.
भ्रांतकाळजी.
भ्राताबंधू.
मकरंदमध.
मखयज्ञ.
मगरनक्र, सुसर.
मंगलपवित्र, शुभ.
मच्छमत्स्य, मासा, मीन.
मजाकरमणूक, गंमत, मौज.
मंजूरकबूल, पसंत, मान्य, संमत.
मजूरकामगार.
मतीबुद्धी.
मंत्रश्लोक.
मत्सरअमर्ष, अर्कद्वेष, आकस, कली, खुन्नस, त्वेष, दुस्वास, वितुष्ट, विद्रोह, विद्वेष, विपट, विरू, वैर, वैषम्य, सळ, हेवा.
मदतसहाय्य, साह्य.
मंदिरदेऊळ, देवालय.
मधुकरभुंगा.
मध्यान्हदुपार.
मनअंतःकरण, अंतर, अंतरंग, अंतर्याम, चित्त, जिव्हार, मानस.
मनसुबाबेत, विचार.
मनाईनिषेध, बंदी.
मनीषाअपेक्षा.
मनुष्यमनुज, माणूस, मानव.
ममताजिव्हाळा, माया, वात्सल्य.
मर्कटवानर.
मलूलनिस्तेज.
मल्लपहिलवान, पहेलवान.
मसणवटास्मशानभूमी.
मस्तकडोके, माथा, शिखर, शीर.
महतीथोरपणा, महत्तव, मोठेपणा.
महागुरु, गुरू, ज्येष्ठ, महान, मोठा, विराट, विशाल.
महानथोर, मोठा.
महिनामास.
महिमाथोरवी, महती, मोठेपणा.
महिलाबाई, ललना, स्त्री.
माकडकपि, मर्कट, वानर, शाखामृग.
मागमूसथांगपत्ता.
माणुसकीमानवता.
माणूसइसम, नर, मनुज, मनुष्य, मानव, व्यक्ती.
मानगळा.
मानभावीढोंगी.
मान्यकबुल, मंजूर, संमत.
मायाकरूणा, कृपा, दया, मायाळू.
मारुतीअंजनीसुत, रामदास, वायुपुत्र पवनसुत, हनुमंत, हनुमान.
मासामत्स्य, मीन.
मित्रदोस्त, यार, सखा, सवंगडी, साथीदार, सुहृद, सोबती, स्नेह, स्नेही.
मिरासीपरंपरागत संपत्ती.
मिश्रणअमेज, अमेद.
मिष्टान्नगोड पदार्थ.
मीनमासा.
मीलनएकरूपता, मिलाफ, मिसळणे, मेळ, समरसता.
मुक्ताफळेबोल, मोती.
मुखआनन, चर्या, चेहरा, तोंड, वदन.
मुनीऋषी, साधू.
मुरारीकृष्ण.
मुलगाआत्मज, तनज, तनय, तनुज, नंदन, नंदन, पुत्र, पुत्रनंदन, बेटा, सुत.
मुलगीआत्मजा, कन्या, कला, तनया, तनुजा, दुहिता, नंदनी, नंदिनी, पुत्री, बेटी, सुता.
मुलुखपरगणा, प्रदेश, प्रांत.
मूलअर्भक, किशोर, धाकटे, पाडस, पोर, बालक, बाळ, मुलगे, शिशू.
मृगयाशिकार.
मृगराजसिंह.
मृत्यूमरण.
मेंदूअक्कल, बुद्धी, मगज.
मेळमिलाफ, मीलन, संगम, संयोग.
मेषमेंढा.
मैत्रीआशनाई, इष्टत्व, एकी, गट्टी, जंगी, जोड, दोस्ती, प्रीती, मेतकूट, यारी, सख्य, सलगी, साम, स्नेह.
मैत्रीणगडणी, सई, सखी, साजणी.
मोदहर्ष.
मोबदलापगार, मेहनताना, वेतन.
मोरकेकी, केळभ, नीलकंठ, मयुर, मयूर, शिखी.
मोलकिंमत, मूल्य.
मोळाखिळा.
मोसमऋतु, समय, हंगाम.
मौजगंमत, मजा.
म्होरक्यानेता, पुढारी.
यजमाननवरा.
यज्ञकतु, धर्मकृत्य, भरव, मख, याग, होम.
यतीसंन्याशी.
यत्नउद्योग, खटपट, परिश्रम, प्रयत्न.
यथार्थबरोबर.
यशजय, विजय, सफलता, सुदैव.
यहसानउपकार, कृपा.
यहुदीतपस्वी, तापस, मुनी, योगी, साधक, साधू.
याचकभिकारी.
याचनामागणे.
यातना१. कष्ट, अपेष्टा. २. वेदना, कळ, दुःख, हाल.
यादआठवण, स्मरण, स्मरणार्थ.
यानजात, भेद, वर्ग, वर्ण.
यामिनीरात्र.
युक्तीशक्कल.
युगुलजोडी.
युतीसंयोग.
युद्धझुंज, धुमश्चक्री, रण, लढाई, संगर, संग्राम, समर.
योग्यअनुरूप, उचित, रास्त, लायक.
योद्धापराक्रमी, भट, लढवय्या, विक्रांत, शूर.
योधयोद्धा, लढवय्या, वीर.
यौवनतारुण्य.
रंकगरीब.
रक्तअसू, असूत, असूद, रगत, रुधिर, शोणित.
रक्षणबचाव, संरक्षण.
रगजोर.
रगडपुष्कड.
रंगणीअंगणामध्ये.
रग्गडप्रचंड.
रचनामांडणी.
रजकधोबी, परीट.
रजनीरात्र.
रजनीनाथचंद्र.
रजाअनुमती, परवानगी, सम्मती.
रणयुद्ध.
रणांगणरणभूमी, समरांगण.
रतिरत, रममाण.
रत्नाकरसमुद्र.
रथीयोद्धा.
रमालक्ष्मी.
रम्यमनोहर, रमणीय, सुंदर, सुरेख.
रवीसूर्य.
रश्मीकिरण.
रस्तापथ, पंथ, पाऊलवाट, पायवाट, मार्ग, रोड, वाट, सडक.
रहस्यगूढ, मर्म.
राक्षसअसुर, असुर, दानव, दैत्य.
रांगओळ.
रागअमर्ष, आवेश, कोप, क्रोध, क्षोभ, चीड, त्वेष, रोष, संताप.
रागीटकोपिष्ट, कोपी, कोपीष्ट, क्रुद्ध, क्रोधी, तमासी, रागिष्ट, संतापी.
राजाअवनीपती, नरेंद्र, नरेन्द्र, नरेश, नृप, नृपती, पृथ्वीपती, प्रजापती, बादशहा, भूधर, भूप, भूपती, भूपाल, भूपेंद्र, भूमिपाल, भूमीपाल, महीपती, राय, लोकपाल, शय, सम्राट.
राजीवकमळ.
राज्यशकटराज्यकारभार.
राणीअजराणी, महाराज्ञी, महाराणी, महिषी, राजपत्नी, राजराणी, राजी, राज्ञी, सम्राज्ञी.
रात्रतमिस्रा, तमी, निशा, यामिनी, रजनी, रात, विभावरी, शर्वरी, शर्वरी.
रानअरण्य, कानन, जंगल, जंगल, वन, विपिन, विपीन.
रामकौसल्यानंदन, जानकीवर, दाशरथी, रघुपती, राघव, रामचंद्र, रामराजा, सीतापती.
रावणअसुरेश्वर, दशमुख, दशवदन, दशानन, लंकाधिपती, लंकेश्वर.
रासखच, ढीग, थर.
रिंगणफेर, वर्तुळ.
रितारिकामा.
रिपूवैरी.
रियाजसराव.
रीणऋण, कर्ज.
रीतपद्धत, रिवाज.
रुचकरचवदार.
रुचीगोडी, स्वाद.
रुबाबऐट, तोरा.
रूक्षकोरडे.
रूपसौंदर्य.
रेखीवसुंदर, सुबक.
रोगआजार, उपद्रव, पीडा, विकार, व्यथा, व्याधी.
रोषराग.
रौनकशोभा, सौंदर्य.
र्‍हासविनाश, हानी.
लक्तरचिंधी.
लक्ष्मीइंदिरा, उत्कर्ष, कमलजा, कमला, पदमा, पद्मजा, पद्मा, महालक्ष्मी, मा, रमा, वैभव, वैष्णवी, श्री, संपत्ती, सान्वी.
लगतजवळ.
लग्नउद्वाह, उपयन, करग्रहण, कल्याण, काजार, दारग्रहण, दारपरिग्रह, निकाह, परवान, परिणय, पाट, पाडगे, पाणिग्रहण, बिहेबिराडे, मोहतूर, विवाह, विहावो, समई.
लंघनउपवास.
लघुताकमीपणा, लहान.
लघूक्षुद्र, क्षुल्लक, र्‍हस्व, लहान, हलका.
लज्जतखुमारी, गोडी, रूची, स्वाद.
लतालतिका, वल्लरी, वल्ली, वेल, वेली.
लतिफावेल.
ललनादत्री, नारी.
ललाटकपाळ.
लवणक्षार, खार, खारट, मीठ.
लष्करफौज, सेना, सैन्य.
लहानकनिष्ठ, छोटा, लघु.
लाघवगोडवा, मार्दव.
लाचारअगतिक, दीन, निरूपाय.
लांच्छनकलंक, काळिमा, ठपका, डाग, दूषण, दोष.
लाटलहर.
लालसाआकांक्षा.
लावण्यसौंदर्य.
लेणेअलंकार, भूषण.
लेवऊनीघालून.
लोकजनता, प्रजानन, रयत.
लोकोत्तरश्रेष्ठ.
लोखंडआय, आयस.
लोणीनवनीत.
वकीलप्रतिनिधी, मुखत्यार.
वखारकोठार, गोदाम.
वचकदरारा.
वंचकफसवणूक करणारे.
वणव्रण.
वत्सबालक, वासरु.
वदनतोंड.
वंदनअभिवादन, नमन, नमस्कार, प्रणाम, प्रणिपात.
वन्हीअग्नी.
वयउमर, वर्ष, साल.
वरदानआशिष, आशीर्वाद, कृपा.
वर्दी(लष्करी), निरोप, पोषाख, बातमी.
वल्लरीलता, वेल.
वसनवस्त्र.
वसाहतवस्ती.
वसुंधरापृथ्वी.
वस्त्रअंबर, कपडा, कपडे, कापड, पट, वसन.
वाघव्याघ्र, व्याल, शार्दुल, शार्दूल.
वाटमार्ग, रस्ता.
वाणीबोल, वाचा.
वादळतुफान.
वाद्यवाजप.
वानगीउदाहरण, दाखला.
वानरकपि, कपी, मर्कट, माकड, शाखामृग.
वामिकाविहीर.
वायसकावळा.
वारसउत्तराधिकारी.
वाराअनिल, गंधवाह, गंधवाहू, पवन, पवमान, प्रभंजन, भवन, मरुत, मरूत, मारुत, वात, वायू, व्यान, समीर, समीरण, हवा.
वारुघोडा.
वारूअश्व.
वालीरक्षक.
वाळवीउधच, भिरडभुंगा, मूस, वाळटी, वोळंबा.
वाळूकंकर, रज, रेती.
वावधानवावटळ.
वावरशेत.
वास१. गंध, खूण, दरवळ. २. सुगावा, परिमल, परिमळ, सुगंध, सुवास.
वास्तपुस्तचौकशी, विचारणा, विचारपूस.
वास्तवखरे, प्रत्यक्ष, यथार्थ, सत्य.
विकल्प१. पर्याय. २. भेद, भ्रम, संशय.
विघ्नअडचण, आपत्ती, प्रतिबंध, संकट.
विचारपूसचौकशी.
विजोडबेडौल, विशोभित, विसंगत.
विडंबनउपहास, टवाळी, फजिती.
विणकरकोष्टी, चाटी, जेड, तंती, तंतुवाय, तन्नुनाथ, बाफेंदा, मेमण, मोमीन, साळी.
वितरणवाटणी, वाटप.
वित्तसंपत्ती.
विद्याज्ञान.
विद्वानकोविद, निष्णात, पंडित, बहुश्रुत, बुध, विज्ञ.
विध्वंसनष्ट, नाश, मोडतोड, संहार.
विनंतीआर्जव, प्रार्थना, विनवणी.
विपत्काळींसंकटकाळी.
विपिनअरण्य.
विपुलखूप, पुष्कळ, भरपूर.
विभवेंवैभवाने.
विमलनिर्मल, निष्कलंक.
वियतआकाश.
विरळक्वचित.
विरसबेरंग.
विराटअतिशय भव्य.
विरूपबेढब.
विरोधप्रतिकार.
विलगअलग, सुटे.
विवंचनाकाळजी.
विवरछिद्र.
विशालअथांग, अफाट, अवाढव्य, प्रचंड, मोठे, विस्तृत.
विश्वजग, दुनिया, सृष्टी.
विश्वासइमान, खात्री, भरवसा.
विषण्णकष्टी.
विषादखेद, दुःख, निराशा, निरूत्साह.
विष्णुअच्चुत, अच्युत, अनंत, अंबरीश, अंबरीष, इंदिरावर, कमलाकांत, कमलापती, कमलावर, कमलेश, केशव, गोविंद, चक्रधर, चक्रपाणि, चक्रपाणी, जगदीश, जगदीश्वर, जगन्नाथ, त्रिविक्रम, नारायण, पद्मनाथ, पद्मनाभ, पितांबर, पीतांबर, पुरुषोत्तम, बालाजी, भगवान्, मधुसुदन, मधुसूदन, मादाणू, माधव, माराणू, मुकुंद, रमापती, रमारमण, रमावर, रमेश, लक्ष्मीपती, लक्ष्मीवर, वासुदेव, शेषशायी, श्रीपती, सभापती, हरी, हृषिकेश, हृषीकेश.
विसावाआराम, विश्रांती.
विस्तीर्णअफाट, विशाल, विस्तृत.
विस्मयनवल.
विहंगपक्षी.
विहारक्रिडा, क्रीडा, खेळ, खेळणे, भ्रमण, लीला, विहरण, सहल, सहलु.
विहीरआड, कूप, बारव, बाव, बावडी.
वीजचंचला, चपला, तडित, बिजली, विद्युत, विद्युल्लता, सौदामिनी, सौदामिनी.
वृक्षअगम, गुल्म, झाड, तरु, तरू, द्रुम, पादप, विटप, शाखी.
वृत्तीस्वभाव.
वृद्धम्हातारा.
वृद्धत्वम्हातारपण, वार्धक्य.
वृश्चिकविंचू.
वेगगती.
वेडाखुळा, मूर्ख.
वेदनाकळ, क्लेश, दुःख, पीडा, यातना, वेणा, व्यथा, शूळ, सल.
वेललता, लतिका, वल्लरी.
वेळकाळ, घडी, समय.
वेळूबांबू.
वेशपोशाख.
वेषकपडे, पेहराव, पोषाख.
वैचित्यविविधता.
वैनतेयगरुड.
वैभवऐश्वर्य, थाटमाट, श्रीमंती.
वैराणउजाड, ओसाड, भकास.
वैरीदुश्मन, शत्रू.
वैषम्यविषाद.
वोळितीभरुन येतात.
व्यवसायधंदा.
व्यवस्थातजवीज, तयारी, प्रबंध, योजना.
व्याकूळकासावीस.
व्याख्यानभाषण.
व्याधीआजार, आपत्ती, पीडा, रोग, संकट.
व्याळसर्प, साप.
व्यासंगअभ्यास.
व्रतवसा.
व्हयमालीबेशरम.
शकशंका, संदेह, संशय.
शंकरअंबरीश, आदिनाथ, आदिपुरुष, आशुतोष, उमाकांत, उमाकान्त, उमापती, उमावर, उमेश, कपाली, कपालेश्वर, कपाळी, कैलासनाथ, गंगाधर, गिरीश, चंद्रशेखर, त्रिनेत्र, त्र्यंबक, दिगंबर, दुर्गेश, नीलकंठ, परेश, पार्वतीश, भालचंद्र, मंगेश, महादेव, महेश, महेश्वर, रुद्र, शंभुमहादेव, शंभू, शिव, शिवशंकर, सदाशिव, सांब, हर.
शंकासंशय.
शक्तीजोम, जोर, ताकद, बळ, सामर्थ्य.
शतशंभर.
शत्रुअरी, दुष्मन, रिपु, विपक्षी.
शत्रूअरि, अरी, दुश्मन, दुष्मन, प्रतिपक्षी, रिपू, विपक्षी, वैरी, वैरी.
शरबाण.
शरमलज्जा, लाज.
शरीरअंग, अंग, काया, कुडी, तनू, देह, वपु, वपू.
शर्यतचढाओढ, स्पर्धा.
शवप्रेत.
शशीचंद्र.
शस्त्रआयुध, हत्यार.
शहरनगर, पुरी, पूर.
शागीर्दअनुयायी, चेला, विद्यार्थी, शिष्य.
शाळाविद्यालय.
शासनराज्यकारभार, राज्यसंस्था, सरकार.
शास्त्रज्ञसंशोधक.
शिकवणउपदेश, बोध.
शिकस्तकमाल, पराकाष्टी, पराकाष्ठा, पराजीत, पराभूत, प्रयत्न.
शिकारीजटक, पायेदामी, लुब्धक, वाघरी, व्याध, शाकुनिक.
शिक्षादंड, मार, शासन, सजा.
शिखाझाडाच्या फांद्या.
शिताफीकौशल्य.
शिरस्तानियम.
शीघ्रअविलंब, जलद, झटपट, झटपट, तत्क्षण, ताबडतोब, त्वरित, त्वरीत, द्रुत, लवकर, सत्वर.
शीणथकवा.
शेखीऐट, प्रौढी, फुशारकी, बढाई.
शेजअंथरुण, शय्या.
शेतक्षेत्र, वावर, शिवार.
शेतकरीकिसान, कृष, कृषक, कृषिक, कृषिवल, कृषीक, कृषीवल.
शेलकेनिवडक.
शेषअनंत, वासुकी.
शैलीढब, लकब, हातोटी.
शोकविलाप.
शोभारोषणाई, सजावट, सौंदर्य.
श्रद्धाआदर, निष्ठा, विश्वास.
श्रांतकंटाळलेला, कष्टी, थकलेला, दमलेला.
श्रीकृष्णकन्हैया, कान्हा, किशा, किसन, किस्ना, कृष्णसखा, गिरिधर, गोपाळ, गोपीवल्लभ, गोविंद, चक्रधर, देवकीनंदन, मधुसूदन, माधव, मीरा के प्रभू, मुकुंद, मुरलीधर, मुरारी, यदुनाथ, यादव, यादवेश्वर, राधाधर, राधारमण, रुक्मिणीवर, वसुदेवसुत, वासुदेव, हरी, हृषिकेश.
श्रीमंतधनवान, धनिक, मालधर, राव, सधन.
श्रीरामकौसल्यानंदन, जानकीवर, दाशरथी, रघुपती, राघव, रामचंद्र, रामराजा, सीतापती.
श्रेणीदर्जा.
श्रेष्ठउत्कृष्ठ, उत्तम.
श्लोककविता, पद्य.
श्वापदजनावर.
संकटआपत्ती, विघ्न.
सकलअखिल, निखिल, सगळा, समस्त, सर्व.
संकल्पनिश्चय, बेत, मनसुबा.
सकाळउषा, प्रभात.
संकोचलाज.
सखासोबती.
संगतसहवास, साथ, सोबत.
संगरयुद्ध.
संग्रहनिधी, संचय, साठा.
संग्रामयुद्ध, लढाई, संगर, समर.
संघगट, चमू, समूह.
संघर्षकलह, झगडा, टक्कर, भांडण.
संचारफिरणे.
सजातीयएकाच जातीचे, वृत्तीचे, स्वभावाचे.
सजीवकमळ.
संतसज्जन, साधू.
सततअविश्रांत, निरंतर, नेहमी, सदा, सर्वदा.
सत्कारआदरसत्कार, मान सन्मान, मानमरातब.
सत्वरलवकर.
सदनभवन.
संधीमोका.
सन्निधजवळ.
संपत्तीअर्थ, आशय, दाम, दौलत, द्रव्य, धन, पैसा, लक्ष्मी, वित्त, संपदा.
संपर्कसंबंध, संसर्ग, सहवास.
सफरप्रवास, यात्रा.
सफाईस्वच्छता.
संबंधसगळे, संपूर्ण, सर्व.
संमतीअनुमती, मान्यता, रूकार, सहमत, होकार.
समरीयुद्धात.
समस्तसकल, सगळे, संपूर्ण, सर्व.
समापनअंत, पूर्णता, पूर्ती, समाप्ती, सांगता.
समाप्तीअंत, पूर्णतहा, पूर्णता, पूर्ती, पूर्वी, समापन, सांगता.
समीपजवळ, नजीक, निकट.
समुद्रअंबुधी, अंबुनिधी, अंबोधी, अब्धि, अंभोनिधी, अर्णव, अवधी, उदधि, उदधी, जलधि, जलधी, जलनिधी, जलाधी, जलाशय, दर्या, नीरराशी, पयोधी, रत्नाकर, रत्नाकार, वारिधी, वारिराशी, वारिसाशी, सरित्पती, सागर, सिंधू.
समूहजमाव, टोळी, दल, मांदियाळी, समुच्चय, समुदाय.
समृद्धीअबादानी, विपुलता.
सरदारउमराव, खवास, मानकरी.
सरपणइंधन, जळण.
सरस्वतीब्राम्ही, ब्राह्मी, भारती, वागीश्वरी, वाणी, विणावादिनी, विद्यादेवी, वीणावादिनी, वेदमाता, शारदा, श्वेतवाहिनी, सावित्री, हंसवाहिनी.
सराईसुगी, हंगाम.
सरिकामैना.
सरितानदी.
सरोजकमळ.
सर्पअहि, अही, उरग, उरंग, तक्षक, भुजंग, विषधर, व्याल.
सलीलपाणी.
सवलतसूट.
सशक्तनलिष्ठ, बलवान.
संशयअंदेशा, कलप, कलफ, कलाफ, कश्मल, किंत, किंतु, किंतू, वहमा, वहीम, विकल्प, शंका, संदेह.
संसर्गसंपर्क, संबंध, सहवास, सहवास.
संहारउच्छाद, उच्छेद, नाश, विच्छेद, विध्वंस, विध्वंस, विनाश, सर्वनाश.
सह्याद्रीपर्वत, सह्य, सह्यगिरी, सह्यगिरी, सह्यपर्वत, सह्याचल.
साकर्यसुकरता, सुकरपणा, सुलभता.
साचखरा, खराखुरा, खरोखर.
साथीदोस्त, मित्र, सखा, सोबती.
साधनातपश्चर्या.
सापअही, उरग, तक्षक, नाग, पन्नग, फणी, भुजंग, विषधर, व्याळ, सर्प.
साफल्यसंपूर्ण नाव.
सामर्थ्यबळ, शक्ती.
सामीलअंतर्भूत, प्रविष्ट, समाविष्ट.
सायंकाळसंध्याकाळ, सांज.
सारिकामैना.
सावधजागरूक, दक्ष, सावधान.
सावलीछाया.
सासूलचाहूल, सुगावा.
साहसधाडस, धारिष्ट.
साहित्यलिखाण, वाड्मय.
सिनेमाचित्रपट, बोलपट.
सिंहकरी, केसरी, पंचानन, मृगराज, मृगिंद्र, मृगेंद्र, मृगेंद्र, मृगेश, वनराज, वनेन्द्र, शार्दुल, शार्दूल.
सीताजानकी, वैदेही.
सीमामर्यादा, मर्यादा, वेस, हद्द.
सुकाळविपुलता.
सुगंधपरिमल, सुवास.
सुगमसोपा.
सुतमुलगा.
सुंदरअभिराम, अभिराम, देखणे, मनोहर, रमणीय, रम्य, ललित, लावण्यभय, सुरूप, सुरेख.
सुंदरतामनोहर, रमणीय, ललित, लावण्य, सुरूपता, सुरेख, स्वरूपता.
सुधाअमृत.
सुरुवातआदि, आदि, आरंभ, ओनामा, प्रारंभ, श्रीगणेशा.
सुरेखमनोहर, रमणीय, रम्य, ललित, सुंदर.
सुरेलगोड आवाज.
सुवासअतलस, आमोद, गंध, दरवळ, द्रुती, परिमल, मकरंद, सुगंध, सौरभ, सौरभ्य.
सुवासिनीअविधवा, अहिवा, ऐहेव, सवाष्ण, सुहाशीण, सौभाग्यवती.
सुविधासोय.
सुस्निग्धअतिशय प्रेमळ.
सुहासहसतमुख.
सूडबदला, वचपा.
सूतदोरा, धागा.
सूरस्वर.
सूर्यअक्र, अंबरीश, अंबरीष, अर्क, अंशुमाली, आदित्य, चंडाशु, चंडाशू, चंडांशू, दिनकर, दिनमणी, दिवाकर, प्रभाकर, भानु, भानू, भास्कर, मार्तंड, मित्र, रवि, रवी, वासरमणी, सविता, सहस्त्रकर, सहस्त्ररश्मी, सहस्रकर, सहस्ररश्मी, हिरण्यगर्भ.
सेनापतीसेनानायक, सेनानी.
सेवाचाकरी, नोकरी, परिचर्या, शुश्रुषा, शुश्रूषा.
सैनिकजवान, शिपाई.
सैन्यकटक, चमू, फौज, लष्कर, सेना.
सैन्याचा समूहकटक, कंपू, जुमला, तट, दळभार, दैबार, पत्ती, पलटन, फौज, बुलंगा, बैरक, भ्रमी.
सोनेकनक, कनन, कांचन, सुवर्ण, हिरण्य, हेम, हेम.
सोबतमैत्री, संगत.
सोबतीमित्र, सवंगडी, स्नेही.
सोमटकोंबट, कोमट.
सोशिकसहनशील.
सोहळाउत्सव, सण, समारंभ.
सौख्यसमाधान, सुख.
सौदादेवघेव, व्यवहार, व्यापार.
स्कंदखांदा (झाडाची फांदी).
स्तुतीप्रशंसा.
स्त्रीअंगना, अबला, कामिनी, नारी, प्रमदा, बाई, भार्या, महिला, मानिनी, रमणी, रमा, रागिणी, ललना, वनिता.
स्थळठिकाण.
स्थानठाव, ठिकाण, वास.
स्थितीअवस्था, दशा, प्रसंग.
स्थित्यंतरस्थितीतील बदल.
स्नानआंघोळ, नहाण, न्हाण.
स्नेहप्रेम, मित्रत्व, मैत्री.
स्पर्धाचढाओढ, चुरस, शर्यत, होड.
स्वर्गइंद्रलोक, ऊर्ध्वलोक, छाप, जन्मत, त्रिविष्टप, दिव्यलोक, दिव्यस्थान, देवपुरी, देवलोक, द्यौ, नाक, नाळा, परत्रगती, पितृलोक, बेहस्त, भोगभूमी, मीना, मुद्रा, शिक्का, सुरलोक, सुरालय, स्वर, स्वर्लोक.
स्वागतआदरसत्कार, आदरातिथ्य.
स्वातंत्र्यस्वतंत्रता.
स्वादिष्टचविष्ट.
स्वार्थीअल्गर्जी, मतलबी.
स्वेच्छयास्वतःच्या इच्छेने.
स्वेतपूल, सांकव, सेतू.
स्वेदघाम, धर्म.
स्वेदजकिटक.
हक्कअधिकार, मालकी, वारसा.
हंगाममौसम.
हठ्यासतीव्र इच्छा, हाव.
हताशनिराश.
हत्तीकरि, करी, कुंजर, गज, गजेंद्र, दंती, द्विरद, नाग, पीलु, वारण, सारंग, हस्ती.
हत्याखून, वध, हिंसा.
हयगयढिलाई, दिरंगाई, दुर्लक्ष, हेळसांड.
हरळीआरोळी, हाक, हाळी.
हरिणकाळवीट, कुरंग, मृग, सारंग.
हरीणकाळवीट, कुरंग, मृग, सारंग.
हर्षआनंद, आमोद, उल्हास, मोद.
हल्लाचढाई.
हाऊळआवाज.
हाकसाद.
हाटबाजार.
हातकर, पाणि, पाणि, पाणी, बाहु, बाहू, भुज, भुजा, भूजा, हस्त.
हानीनुकसान.
हावतीव्र इच्छा.
हिकमतकावा, चातुर्य, मसलत, युक्ती.
हिंमतधाडस, धैर्य, साहस.
हिमालयनगपती, नगराज, नगाधिराज, नगेंद्र, हिमाचल, हिमाद्री.
हिरण्यसोने.
हुकमतअधिकार.
हुबेहूबतंतोतंत.
हुरहुरकाळजी, चिंता, चुटपुट, रूखरूख.
हुरुपउत्साह, जोम, हुशारी.
हुरूपउत्साह.
हुशारकलमतराश, कसबी, चतुर, चलाख, चाणाक्ष, तरबेज.
हृदयअंतःकरण, अंतर, अंतर, काळीज, मन.
हेरगुप्त माहिती काढणारा.
हेळसांडअळंटळं, दिरंगाई, सुस्ती.
हेवाआग्रह, द्वेष, मत्स, हट्ट.
हैबनदरारा, दहशत, धास्ती.
होडीतर, तरी, नाव, नौका.
होलेपात्र.

हिंदी

अर्थ:

पर्यायवाची शब्द.

English

Meaning:

Synonyms.