विराणी
मराठी
व्याकरण:
स्त्रीलिंगी - नाम.
अर्थ:
'विराण्या' हे विराणीचे अनेक वचन. विराणी म्हणजे विरहात राहून परमात्म्याशी मिळू पाहणारी व्यक्ती. म्हणून तिला विरहिणी किंवा विराणी म्हणतात. मराठी संतांनी विरहाच्या व मीलनाच्या अनेक आंर्तगर्भ विराण्या लिहिल्या. जीव परमात्म्याच्या भेटीसाठी किती व्याकुळ होतो. त्याच्या मनाची तडफड कशी होते. त्याच्या जीवाची लाही लाही कशी होते याचे मोठे सुंदर वर्णन विराण्यांतून होते. हा विरह शेवटी मीलनाजवळ संपतो. तो जीवाचा सखा भेटतो आणि मीलनाचा आनंद चारी बाजूंनी उसळून येतो. जीवाशिवातील विरहाचा, आतुरतेचा, मानसिक कष्टाचा, मीलनाच्या सुखाचा आणि पुत्रसुखोपभोगासाठी विरहाचा आनंद मराठी संतांनी अनुभवला आहे.
शब्दार्थ / समानार्थी शब्द:
शब्द | शब्दार्थ / समानार्थी |
---|---|
विराणी | १. दुःखी गाणे. २. (स्त्री.) दाढ, जमीन भाजण्यापूर्वी आग पसरू नये म्हणून तिच्या भोवतीची भाजली जाणारी जागा. ३. रीस; विराणी; आगीचा प्रसार होऊं नये म्हणून भोंव- तालची जाळलेली जागा; ईर. ४. विराणी म्हणजे विरहात राहून परमात्म्याशी मिळू पाहणारी व्यक्ती. |